आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेशात काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवता आला नाही. शुक्रवारी सुमारे तासभर चाललेल्या 40 आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांच्या बैठकीत अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडण्यात आला. आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय थेट दिल्लीतून घेतला जाणार आहे.
तासभर खलबतं पण एकमत नाही
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह, सुखविंदर सक्खू, मुकेश अग्निहोत्री, चंद्र कुमार, हर्षवर्धन चौहान आणि धनीराम शांडिल यांच्या नावांसह सहा चेहऱ्यांवर चर्चा झाली. पण कोणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. मात्र, प्रतिभा सिंग आणि सुखविंदर सक्खू यांच्या नावावर सर्वात मोठा पेच अडकला आहे.
सर्व अधिकार हायकमांडकडे
काँग्रेसचे हिमाचल प्रभारी राजीव शुक्ला म्हणाले - आमदारांनी अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार पक्ष हायकमांडला दिले आहेत. हा प्रस्ताव आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी मांडला, त्याला सर्व 40 आमदारांनी सहमती दर्शवली. निरीक्षक उद्या हायकमांडला अहवाल सादर करतील. त्यानंतर लवकरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊन घोषणा केली जाईल. सर्व निर्णय हायकमांड घेतील. पक्षात गटबाजी नाही असा दावाही केला गेला.
सभेला पाच तास विलंब
दुपारी 3 वाजता काँग्रेस आमदारांची बैठक होणार होती, मात्र सर्व आमदार फिरकले नाहीत. त्यानंतर काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, निरीक्षक भूपेश बघेल आणि भूपेंद्र हुड्डा यांनी संध्याकाळी 6 वाजताची वेळ निश्चित केली. असे असूनही साडेसातच्या सुमारास सभा सुरू होऊ शकली.
प्रतिभा आणि सक्खू समर्थकांमध्ये हाणामारी
हिमाचल काँग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. निरीक्षकांच्या उपस्थितीत प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. सायंकाळच्या बैठकीत भूपेश बघेल पक्ष कार्यालयात पोहोचले तेव्हा काही समर्थक त्यांच्या गाडीवरही चढले. प्रतिभा समर्थकांनी काँग्रेस कार्यालयालाही घेराव घातला.
मुख्यमंत्रिपदाचे दुसरे मोठे दावेदार सुखविंदर सखू हेही प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पक्ष कार्यालयात पोहोचले. ते येताच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून कार्यालयात नेले. यादरम्यान सखू आणि प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीही झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. समर्थकांना हाताळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करावे लागले.
खुर्चीवरुन घमासान
तत्पूर्वी हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून घमासान माजले आहे. यामुळे 6 वा. होणारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक पाच तासानंतर झाली. या बैठकीला काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला, निरीक्षक भूपेश बघेल व भूपेंद्र हुड्डा काँग्रेस कार्यालयात पोहोचले. तेव्हा संध्याकाळपर्यंत 14 प्रतिनिधीच पोहोचले होते.
बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्यासह मुख्यमंत्रीपदाचे इतर दावेदार धनीराम शांडिल व राजेंद्र राणा हे ही आधीच काँग्रेस कार्यालयात पोहोचले होते. याशिवाय मोहनलाल ब्राक्टा, नंदलाल, हर्षवर्धन चौहाण, रोहित ठाकूर, जगतसिंह नेगी, सुंदर ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो व आर. एस. बालीही प्रदेश कार्यालयात पोहोचले होते.
निरीक्षक राज्यपालांना भेटले, स्थानिक नेते अनुपस्थित
काँग्रेसचे हिमाचल प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. पण त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता उपस्थित नव्हता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्रीपदावर राज्यातील 6 नेत्यांनी दावा केला आहे.
दुसरीकडे, राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी केवळ प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री तथा निरीक्षक भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा हे 3 नेतेच पोहोचले. त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता किंवा आमदार उपस्थित नव्हता. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अपडेट्स...
प्रथम चंदीगडमध्ये बोलावण्यात आली होती बैठक
काँग्रेसने शुक्रवारी चंदीगडमध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्यानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचे बहुतांश आमदार चंदीगडला रवाना झाले होते. पण सायंकाळी उशिरा बैठकीचे स्थान शिमला करण्यात आले.
CM पदावर हे नेते करत आहेत दावा
मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या नेत्यांचे गुरुवारी रात्रभर बैठकांचे सत्र सुरू होते. यात प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखविंदर सिंह आपल्यासाठी लॉबिंग करत होते. पण त्यांच्या नावावर मतैक्य झाले नाही. मुख्यंमत्रीपदाच्या शर्यतीत राजेंद्र राणा ठाकूर, ज्वालीचे चंद्र कुमार, सोलनचे धनीराम शांडिलही आहेत.
उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात सिंह समर्थक
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतिभा सिंह यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर त्यांचे समर्थक विक्रमादित्य सिंह यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करू शकतात. विक्रमादित्य प्रतिभा यांचे सुपुत्र आहेत. असे झाले झाले तर प्रथमच राज्याला उपमुख्यमंत्री मिळेल.
प्रतिभा सिंह मुख्यमंत्री बनण्यावर संशय
प्रतिभा सिंह सद्यस्थितीत प्रदेशाध्यक्षांसह मंडी मतदार संघाच्या खासदारही आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करून काँग्रेस मंडी मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याची रिस्क घेऊ शकत नाही. कारण, मंडी जिल्ह्यातील 10 पैकी 9 जागा जिंकून भाजपने दमदार कामगिरी केली आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी येथून 37 हजारांहून अधिक मतांनी विक्रमी विजय मिळवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.