आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेशात मंगळवारी सकाळी कालका - शिमला राष्ट्रीय महामार्गावर एका इनोव्हा कारने 9 मजुरांना चिरडले. त्यात 5 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती नाजूक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या तिन्ही जखमींना PGI चंदीगडला रेफर करण्यात आले आहे. तर एकाला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इनोव्हा परवाणूला जात होती
DSP परवाणू प्रणव चौहान या अपघाताची पुष्टी करत म्हणाले की, ही दुर्घटना सोलनमधील धर्मपूरलगत एका पेट्रोल पंपाजवळ घडली. आपल्या कामावर जाणाऱ्या मजुरांना भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हाने चिरडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातावेळी इनोव्हा टॅक्सी सोलनहून परवाणूकडे जात होती.
इनोव्हा नुकसानग्रस्त स्थितीत आढळली
DSP ने सांगितले की, इनोव्हाने धर्मपूरपासून पुढे काही अंतरावरील सुक्की जोहडीजवळ 9 स्थलांतरीत मजुरांना चिरडले. काही वाटसरूंनी या अपघाताची माहिती पोलिस व रुग्णवाहिकेला दिली. इनोव्हाचा क्रमांक HP02A-1540 असून, ती नुकसानग्रस्त स्थितीत रस्त्याच्या शेजारी आढळली आहे. इनोव्हा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
23 वर्षीय तरुण चालवत होता इनोव्हा
DSP यांच्या माहितीनुसार, गढखल येथील 23 वर्षीय राजेश कुमार नामक तरुण ही इनोव्हा चालवत होता. या घटनेत गुड्डू यादव, राजा वर्मा, निप्पू निषाद, मोतीलाल यादव व सन्नी यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण बिहार व उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.