आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच भाजप व काँग्रेसने झंझावाती प्रचाराला सुरुवात केली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र माेदी, तर काँग्रेसकडून अध्यक्ष खरगे मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान माेदींनी सिमला व कांगडामधील जाहीर सभांतून काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस िवकासाची शत्रू आहे. भाजप विकासाचा समर्थक आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आेडिशा, गुजरात व नागालँडच्या जनतेने काँग्रेसला अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर ठेवले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरच्या जनतेनेदेखील या वेळी हेच केले.
भाजप मूर्ख बनवू शकत नाही : खरगे सिमला । राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे सिमल्याच्या बनुटीमध्ये जाहीर सभेत म्हणाले- काँग्रेस दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करेल. भाजप राज्यातील जनतेला आता मूर्ख बनवू शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.