आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत 20 चेहरे:कॅबिनेटविषयी काँग्रेसचे मंथन सुरु; कांगडातून 2-3 चेहरे चर्चेत

देवेंद्र हेटा, शिमला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. मंत्रिमंडळात या वेळी काही नवे चेहरे बघायला मिळू शकतात. तसे पाहिल्यास मंत्रिमंडळाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचे नाव ठरल्यानंतरच होईल. मात्र सध्या 20 ते 21 नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. कांगडा आणि शिमल्यात काँग्रेसच्या मोठ्या विजयाने या दोन्ही जिल्ह्यांना 4 ते 5 मंत्री मिळू शकतात.

शिमल्यातून रोहित, विक्रमादित्य यांची नावे आघाडीवर

शिमल्यातून 8 पैकी 7 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडून इथे किमान दोन मंत्री दिले जाणे निश्चित आहे. जिल्ह्यातील जुब्बल कोटखाई जागेवरून रोहित ठाकूर यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मागील वीरभद्र सरकारमध्ये रोहित सीपीएसही राहिले होते. विक्रमादित्य सिंह यांचे नावही मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहे.

सध्या प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. अशा स्थितीत होली लॉजला मुख्यमंत्री पद किंवा मंत्रिपद तर नक्कीच मिळेल. विक्रमादित्य यांना उपमुख्यमंत्री केले जाण्याचीही चर्चा आहे. मात्र यावर अंतिम निर्णय हायकमांडचा असेल.

राठोड, ब्राक्टा आणि अनिरुद्धही शर्यतीत

शिमला जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या शर्यतीत ठियोगचे कुलदीप राठोड, रोहडूतून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले एमएल ब्राक्टा आणि कसुम्प्टीहून अनिरुद्ध यांचेही नाव समोर येत आहे. पण शिमला जिल्ह्यातून कमाल दोनच मंत्री केले जाऊ शकतात.

कांगडाला मिळू शकतात 3 मंत्री

कांगडा जिल्ह्यातूनही काँग्रेसचे 11 आमदार विजयी झाले आहेत. यात चंद्र कुमार यांचे नावही आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. चंद्र कुमार मुख्यमंत्री झाल्यास कांगडाला 2 मंत्री मिळू शकतात. ते मुख्यमंत्री झाल्यास कांगडातून 3 मंत्री होऊ शकतात. माजी मंत्री धर्मशाळातील आमदार सुधीर शर्मा, ज्वालामुखीहून संजय रत्न, जयसिंहपूरहून यादवेंद्र गोमा, पालमपूरहून आशीष बुटेल यांच्यापैकी दोन जणांना मंत्रीपद मिळू शकते.

उनालाही मंत्रिपदाची आशा

उना जिल्ह्यात काँग्रेसला 5 पैकी 4 जागांवर विजय मिळाला आहे. येथून मुकेश अग्निहोत्री शर्मा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. अग्निहोत्री मुख्यमंत्री झाल्यास काँग्रेसकडून उनामधून एखादा मंत्री दिला जाऊ शकतो. ते मुख्यमंत्री झाले नाही तर ते उनामधून एकमेव मंत्रीही होऊ शकतात.

हमीरपूरला मिळू शकते मोठी जबाबदारी

माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार यांचा गृह जिल्हा असलेल्या हमीरपूरने भाजपला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे हमीरपूरलाही नेतृत्व मिळू शकते. जिल्ह्यातील नादौनच्या जागेवरून सुखविंदर सिंह सुक्खूही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. सुक्खू मुख्यमंत्री झाल्यास जिल्ह्यातून इतर कुणाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. सुक्खू मुख्यमंत्री झाले नाही तर त्यांच्याशिवाय सुजानपुरातून राजेंद्र राणांना मंत्री बनवण्याचा विचार पक्षाकडून केला जाऊ शकतो.

सोलनला एक मंत्रिपद मिळणे निश्चित

सोलन जिल्ह्यानेही भाजपला क्लीन स्वीप दिला आहे. जिल्ह्यातील 4 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याला एक मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. सोलनहून धनीराम शांडिल यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. ते मुख्यमंत्री नाही झाले तर ते मंत्री होणे जवळपास निश्चित आहे.

हर्षवर्धन आणि धर्माणीही शर्यतीत

सिरमौर जिल्ह्यातून हर्षवर्धन चौहानही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री न झाल्यास ते मंत्री होणे निश्चित मानले जात आहे. अशाच प्रकारे घुमारवीहून राजेश धर्माणींनाही मंत्री केले जाऊ शकते. मात्र धर्माणींना मंत्री बनवताना हे बघितले जाईल की, बिलासपूरहून काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे. चंबा जिल्ह्यातील भटियातहून कुलदीप पठानियाही मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे मानले जात आहेत. कुल्लू जिल्ह्यातून काँग्रेसच्या सुंदर सिंह यांनाही जबाबदारी मिळू शकते.

अनुसूचित जमाती कोट्यातून हे मंत्री निश्चित

अनुसूचित जमाती कोट्यातून किन्नौरचे आमदार जगत सिंह नेगी यांना मंत्रिपद मिळणे जवळपास निश्चित आहे. या कोट्यातून लाहौल स्फितीचे आमदार रवि ठाकूर यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते.

मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्र्यांची शक्यता

हिमाचलच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 12 जणांचा समावेश केला जाऊ शकतो. सुरुवातीला सर्व मंत्री नियुक्त केले जातील की, नेहमीप्रमाणे 8 किंवा 9 मंत्री नियुक्त केले जातील हे काँग्रेसच्या धोरणावर अवलंबून असेल. सामान्यपणे प्रत्येक सरकारकडून दोन ते अडीच वर्षांत काही नव्या मंत्र्यांचा समावेश केला जातो.

यांच्यातूनच सभापती आणि उपसभापतींची नियुक्ती

सध्या 20 ते 21 नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मंत्री नियुक्त करताना प्रादेशिक आणि जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाईळ. यापैकीच एखादे नेता सभापती आणि उपसभापतीपदी नियुक्त केले जाऊ शकतात.

मंडी जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार नाही

राज्यातील प्रत्येक सरकारमध्ये मंडी जिल्ह्यातून दोन मंत्री असतात. मात्र यावेळी जिल्ह्यातूल 10 पैकी 9 जागांवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मंडी जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...