आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये समान नागरी कायदा आणणार भाजपा:निवडणूक जाहिरनाम्यात 8 लाख रोजगार, महिलांना फ्री सिलिंडर देण्याची ग्वाही

शिमलाएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

भाजपने रविवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहिरनामा जारी केला. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जारी केलेल्या या जाहिरनाम्यात पक्षाने 11 मुख्य मुद्यांवर भर दिला आहे. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सिकंदर कुमार यांनी सांगितले की, समाजातील सर्वच घटकांना लक्षात घेऊन हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे. हे जनतेच्या विश्वासाचे संकल्पपत्र आहे. यासाठी जवळपास 25 हजार नागरिकांनी सूचना केल्या होत्या.

हिमाचल प्रदेशात भाजपचा जाहिरनामा जारी करताना पक्षाध्यक्ष जे पी नड्डा.
हिमाचल प्रदेशात भाजपचा जाहिरनामा जारी करताना पक्षाध्यक्ष जे पी नड्डा.

भाजपजच्या मॅनिफेस्टोतील घोषणा...

 • सरकारी नोकऱ्यांत महिलांना 33% आरक्षण
 • 12 जिल्ह्यांत कन्या वसतीगृहांची स्थापना करणार
 • हिम केअर कार्डात कव्हर न होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी महिलांसाठी स्त्री शक्ती कार्ड देणार
 • इयत्ता 12 वीत 5000 रँक असणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2500 शिष्यवृत्ती देणार
 • गरीब कुटुबातील 30 वर्षांवरील महिलांचा अटल पेंशन योजनेत समावेश करणार
 • देवी अन्नपुर्णा योजनेतून गरीब महिलांना 3 मोफत स्वयंपाकाचे सिलिंडर मिळणार
 • मुख्यमंत्री शगुन योजनेतून बीपीएल कुटुंबाला 31000 ऐवजी 51000 देणार
 • माता व नवजात बाळाच्या देखभालीसाठी महिलांना 25000 रुपयांचा निधी देणार
 • महिलांना होमस्टे चालवण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देणार
 • शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल व स्कूटी देणार
 • 900 कोटी रुपयांचा कॉर्प्स फंड क्रिएट करणार
 • तरुणांसाठी हिम स्टार्टअप योजना सुरू करणार
 • 5 नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा
 • सेब कार्टनवर 12% GST लागणार, वाढीव खर्च राज्य सरकार उचलणार
 • धार्मिक पर्यटन स्थळांना रस्ते मार्गाने जोडणार
 • सर्वच गावांना पंतप्रधान ग्राम सडक योजनेने जोडणार
 • 8 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा
 • यूनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा लागू करणार
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत हिमाचल भाजपच्या नेते जाहिरनामा जारी करताना.
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत हिमाचल भाजपच्या नेते जाहिरनामा जारी करताना.

काँग्रेसने OPS वर केली घोषणा

OPS वर काँग्रेसने यापूर्वीच आपल्या जाहिरनाम्यात मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यानंतर आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ओपीएस पारित केले जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

जाहिरनामा जारी करताना हे नेते होते उपस्थित

भाजपचा जाहिरनामा जारी करताना पक्षाचे जेष्ठ नेते शिमल्यात उपस्थित होते. यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप, जाहिरनामा समितीचे अध्यक्ष व खासदार डॉक्टर सिकंदर कुमार यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...