आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 68 पैकी 17 जागांवर विजय झाला आहे. तर 22 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या डोंगराळ राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, संभाव्य घोडेबाजार काँग्रेसने आपल्या सर्वच आमदारांना पक्ष मुख्यालयात येण्याचे निर्देश देण्यात आलेत. सध्या त्यांना राज्याबाहेर शिफ्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
काँग्रेसच्या गोटातील सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची हिमाचलच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. हे दोन्ही नेते लवकरच शिमला गाठणार आहेत. त्यांच्यासोबत हिमाचलचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्लाही शिमल्याला येणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस आपल्या आमदारांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना राज्याबाहेर हलवण्याच्या तयारी आहे. त्यानुसार या आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थानात पाठवण्यात येईल. पण अद्याप या प्रकरणी स्थिती स्पष्ट नाही.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, हिमाचलमध्ये काँग्रेसला एकहाती बहुमत मिळाले तर सर्वच आमदार आपापल्या मतदार संघांत राहतील. पण याविषयीचा अंतिम निर्णय हायकमांड घेईल. पण 40 किंवा त्याच्या आसपास जागा मिळाल्या तर काँग्रेस सर्वच आमदारांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवेल.
काँग्रेस सरचिटणीस विक्रमादित्य सिंह यांनी राज्यात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले - राज्यात काँग्रेसचे सरकार येणार आहे. भाजप गडबड पार्टी आहे. पण आम्ही चुकांतून खूप काही शिकलो. प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा आहेत. त्यावर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा होईल. पण यासंबंधीचा कोणताही निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.
भूपेश बघेल चंदीगडमध्ये ठोकणार तळ
मुख्यमंत्री भूपेश बघेल थोड्याच वेळात रायपूरहून चंदीगडला रवाना होतील. विमानतळावरून ते थेट हॉटेल रेडिसनला जातील. तिथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत हिमाचलमधील आगामी रणनीतीवर चर्चा करतील. तसेच गरज भासली तर ते आजच शिमल्याला रवाना होतील. तिथे त्यांना काँग्रेस विधीमंडळ पक्षाला एकजूट ठेवण्याचे काम करावे लागेल.
राजीव शुक्ला व दुसऱ्या प्रमुख नेत्यांनीही दिल्लीत पूर्वीपासूनच मोर्चा सांभाळला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसला हिमाचलमध्ये 68 पैकी 17 जागांवर विजय झाला आहे. तर 22 पक्षांवर हा पक्ष आघाडीवर आहे. याऊलट भाजपला या डोंगराळ राज्यात अवघ्या 13 जागा मिळाल्या असून, 13 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. 3 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.
BJP काहीही करू शकते -बघेल
याविषयी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, हिमाचलमध्ये मतमोजणी सुरू आहे. तिथे काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. भाजपचा भरवसा नाही. त्यामुळे आम्ही आमचे नवनिर्वाचित आमदार सांभाळून ठेवू. त्यांना कुठे न्यायचे हे नंतर ठरवले जाईल. ------------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.