आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himachal Pradesh Firecrackers Company Blast | Marathi News | Big Explosion In The Company Of Firecrackers; 7 Killed, 10 Injured |

हिमाचल प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना:फटाक्याच्या कंपनीत मोठा स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका फटाके तयार करणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत 7 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट बथू इंडस्ट्रियल एरियामध्ये असणाऱ्या एका कारखान्यात झाला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, अग्निशमन दलाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी मोठा प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून, आजूबाजूच्या परिसराची चौकशी सुरू आहे.

अचानक झाला स्फोट
आज सकाळी ही घटना घडली असून, ज्यावेळी कंपनीत स्फोट झाला. त्यावेळी अनेक कामगार काम करत होते. या घटनेत सात जणांचा मृत्यू झालू असून, 10 कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

सर्व बाजूंनी तपास सुरू
स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती देताना डीएसपी हरोली अनिल पटियाल म्हणाले की, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट कसा घडला. याचे सर्व बाजूंनी तपास सुरू आहेत. सध्या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...