आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. हे व्हिडीओ बऱ्याचदा हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एका घटनेचा व्हिडीओ आला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एका तरुणीला कारने धडक दिली आणि कार थेट मोमोज स्टॉलमध्ये घुसली. या अपघातामध्ये मुलीच्या डोक्याला आणि कोपराला दुखापत झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
अपघातादरम्यान कारमध्ये 4 जण होते. या धडकेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. अपघाताची माहिती मिळताच शिमला पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलीला तातडीने आयजीएमसीमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मुलीच्या डोक्याला व कोपरावर किरकोळ जखमा आहेत, मात्र अचानक झालेल्या धडकेमुळे मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आहे.
मोमोज स्टॉल मालकाचे नुकसान
स्टॉल लावून मोमोज विकणारा रवी म्हणाला की, गाडीने तरुणीला धडकल्यानंतर माझ्या स्टॉलमध्ये घुसली. त्यामुळे स्टॉल, टेबल, खुर्ची, खाद्यपदार्थ सर्वांची नासधूस झाली. स्टॉलवर फास्ट फूड संपल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अपघात टळला. जर हीच घटना 5 मिनिटे अगोदर घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. शिमला पोलिसांनी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही काढले असून कार ताब्यात घेतली असून चार तरुणांची पोलिस चौकशी करत आहेत.
खरेतर रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना आपण नेहमीच सावध राहिले पाहिजे, कारण कधी काय होईल आणि कोणते संकट कुठुन येईल हे सांगणे कठीण आहे. तसेच कितीही खबरदारी घेतली तरी देखील बऱ्याचदा दुसऱ्यांच्या चुकीमुळे देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
हैदराबादच्या हयातनगर परिसरात एका कारने दोन तरुणींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुसरी तरुणी गंभीर जखमी आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेली तरुणीचे नाव निवेदिता सूरज असे आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.