आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Update | Why Bjp Lost Assembly Election | Himachal Pradesh

हिमाचलच्या 6% व्होटर्सनी केला भाजपचा पराभव:2% टक्के जास्त मतांमुळे काँग्रेसला 19 जागांचा फायदा, बंडखोरांमुळे खेळ बिघडला

शिमला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची परंपरा कायम राहिली आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताच्या 35 या जादुई आकड्यापेक्षा जास्त म्हणजे 68 पैकी 40 जागा जिंकल्या. तर पंरपरा बदलण्याचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला गतवेळच्या तुलनेत 19 जागांचा तोटा झाला. 3 जागांवर बंडखोर जिंकले. सरकारविरोधी लाट, परफॉर्मंस, तिकिट वाटप व स्वपक्षीयांचीच बंडखोरी या गोष्टी भाजपला भोवल्या.

चला तर मग 10 मुद्यांद्वारे जाणून घेऊया अखेरिस कोणत्या कारणांमुळे भाजपला स्वतःची सत्ता राखता आली नाही...

1. जनतेची नाराजी व विक्रमी मतदान

2022 च्या निवडणुकीत विक्रमी 76% मतदान झाले. हा आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान होते. मागील 37 वर्षांच्या इतिहासात हिमाचलमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली किंवा घसरली तरी सत्ताधारी पक्षाला सरकार गमवावे लागले आहे. यावेळी सरकारी कर्मचारी व सफरचंदाचे व्यापारी सरकारवर नाराज होते. त्यामुळे भाजपला गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा 6% कमी मतदान मिळाले.

यापैकी 2% मतदान काँग्रेसच्या खात्यात शिफ्ट झाले. तर उर्वरित 4% अपक्ष व आम आदमी पार्टीच्या खात्यात गेले. कांग्रेसला यामुळे 19 जागांचा फायदा झाला. गतवेळसारखे यंदाही अपक्षांना 3 जागा जिंकता आल्या. तर प्रथमच हिमाचलच्या रिंगणात उतरलेल्या आपलाही 1.1% मतदान घेण्यात यश मिळाले.

2. प्रेम कुमार धूमालांकडे दुर्लक्ष करणे भोवले

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांच्या हमीरपूर जिल्ह्यात भाजपला भोपळाही फोडता आला नाही. येथील 5 पैकी 4 जागा काँग्रेसने, तर 1 जागा अपक्षाने जिंकली. यावेळी धूमल यांनी स्वतः निवडणूक लढली नाही. संपूर्ण निवडणुकीत ते शांत राहिले. कराण, मागील 5 वर्षांत नड्डा व मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांच्या गटाला बाजूला सारले होते.

अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर लोकसभा मतदार संघात सभा घेतल्या. पण स्वतः धूमल फार सक्रीय दिसले नाही. त्यामुळे धूमल गटाला ही निवडणूक भाजपने जिंकू नये असे वाटत असल्याची चर्चा होती.

3. BJPवर उलटली तिकीट कापण्याची रणनीती

भाजपने निवडणुकीपूर्वी आपल्या विद्यमान आमदारांवरील जनतेची नाराजी ओळखली होती. पण ही नाराजी दूर करण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरली नाही. ज्या 10 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले, त्यांनी बंडखोरी केली. उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांनाही मतदारांचा रोष पत्करावा लागला. हे नेतेही जिंकले नाही. धर्मपूर मतदार संघातून सलग 7 निवडणुका जिंकण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या मंत्री महेंद्र सिंह ठाकूर यांच्या जागी त्यांचे सुपुत्र रजत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. पण ते पराभूत झाले.

4. भाजपला भोवले 21 बंडखोर

तिकीट वितरणानतर राज्यातील 68 पैकी 21 जागांवर भाजपत बंडखोरी झाली. किन्नौरमधील माजी आमदार तेजवंत नेगी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढली. तिथे भाजपचा पराभव झाला. देहरा मतदार संघातही अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या होशियार सिंह यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. निवडणुकीपूर्वी भाजपने होशियार सिंह यांना पक्षात प्रवेश दिला. पण उमेदवारी दिली नाही.

त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन निवडणूक लढली. फतेहपूर मतदार संघात पक्षाचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांच्या बंडखोरीमुळे मंत्री राकेश पठानिया हरले. कुल्लु व मनालीच्या जागेवरही बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. नालागड जागेवर भाजपचे बंडखोर के एल ठाकूर अपक्ष म्हणून जिंकले. चंबा सदर मतदार संघातही तिकीट देणे व नंतर मागे घेण्यामुळे बंडखोर झालेल्या इंदिरा कपूर यांच्यामुळे भाजपला उमेदवाराला काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला.

शिमल्यात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना राजीनामा सुपूर्द करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर.
शिमल्यात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना राजीनामा सुपूर्द करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर.

5. मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देणे महागात पडले

यंदा भाजप सरकारच्या 10 पैकी 8 मंत्र्यांना पराभव सहन करावा लागला. यात सुरेश भारद्वाज, रामलाल मारकंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकूर, राकेश पठानिया, डॉ. राजीव सैजल, सरवीन चौधरी, राजेंद्र गर्द यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह विक्रम ठाकूर व सुखराम चौधरी यांचाच निवडणुकीत विजय झाला.

जयराम यांच्या मंत्र्यांविरोधात जनतेत तीव्र नाराजी होती. या मंत्र्यांपर्यंत पोहोचता येत नसल्याचीा जनतेची तक्रार होती. त्यांची कामेही ते करतर नव्हते. वर्क फ्रंटवर या मंत्र्यांची कामगिरीही अत्यंत वाईट होती. निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेतही अनेक मंत्र्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे तोट्याचा सौदा असल्याचे स्पष्ट झाले होते.

6. ओल्ड पेंशन स्कीमवरील (OPS) भाजपचे मौन

हिमाचलमध्ये जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या घरातील किमान 1 व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत. कर्मचारी डॉमिनेंट स्टेट असल्यामुळे याठिकाणी सरकारी कर्मचारी विरोधात गेले की सत्तांतर होते असेही मानले जाते. हिमाचलचे बहुतांश कर्मचारी म ागील 2-3 वर्षांपासून जुन्या पेंशन स्कीमनसाठी आंदोलन करत होते. पण सत्ताधारी भाजपने या मुद्यावर केव्हाही स्पष्ट भूमिका घेतली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत ओपीएस योजना लागू करण्याची ग्वाही दिली. याचा फायदा त्यांना झाला.

7. सफरचंद बागायतदारांची नाराजी

जयराम ठाकूर सरकारच्या काळात सफरचंदाच्या पॅकिंगशी संबंधित सामानावर जीएसटी लावण्यात आल्यामुळे सफरचंदाचे पीक घेणारे बागायतदार नाराज होते. हिमाचलच्या 24 विधानसभा मतदार संघातील बहुतांश कुटुंबांची रोजी-रोटी सफरचंदांवर अवलंबून आहेत. यातील 14 विधानसभा क्षेत्रातील 80 टक्के कुटुंब तर पूर्णतः सफरचंदावर अवलंबून आहेत. त्यांनी यासाठी प्रदिर्घ आंदोलनही केले. पण सरकारने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

अप्पर हिमाचल व सफरचंद बेल्टमध्ये भाजपचा दारुन पराभव झाला. शिमला, कुल्लु, लाहुल-स्पीति व किन्नौरमध्ये त्याची स्थिती अत्यंत वाईट ठरली. आदिवासी किन्नौर व लाहौल स्पीतित काँग्रेसचा विजय झाला. सोलनमध्येही भाजपला भोपळा फोडता आला नाही. शिमला जिल्ह्यातील 8 पैकी 5 जागा काँग्रेसला मिळाल्या.

8. काँग्रेसचे आश्वासन -प्रत्येक महिलेला 1500 रू.

काँग्रेसने राज्यातील 18 वर्षांवरील सर्वच महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची ग्वाही दिली होती. हे आश्वासन आपनेही दिले होते. पण आपने निवडणुकीच्या पूर्वीच मैदान सोडले. यामुळे महिलांनी काँग्रेसच्या पारड्यात मतदान टाकले. हिमाचलमध्ये यंदा महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत 6 टक्के जास्त होती.

9. 5 लाख नोकऱ्यांची ग्वाही

हिमाचल प्रदेशाला कर्मचाऱ्यांचे राज्यही म्हटले जाते. पण जयराम यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला मागील 5 वर्षांत नोकऱ्या देण्यात अपयश आले. ठाकूर यांच्या कार्यकाळातील नियुक्त्याही सातत्याने संशयाच्या भोवऱ्यात राहिल्या. काँग्रेसने हा मुद्दा ओळखला. प्रियंका गांधी यांनी आपल्या प्रत्येक सभा व रॅलीत काँग्रेसचे सरकार आले तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 1 लाख नोकऱ्या देण्याची ग्वाही दिली. म्हणजे काँग्रेसने 5 वर्षांत 5 लाख नोकऱ्या देण्याची ग्वाही दिली.

शिमल्याच्या रिज मैदानावर लोकांनी टीव्ही स्क्रीन लावून निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेतली.
शिमल्याच्या रिज मैदानावर लोकांनी टीव्ही स्क्रीन लावून निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेतली.

10. अग्निवीर योजनेमुळेही नुकसान

हिमाचलमधील तरुण मोठ्या संख्येने लष्करात जातात. पण केंद्राने आर्मीत भरती होण्यासाठी अग्निवीर योजना लागू केल्यामुळे येथे प्रचंड नाराजी पसरली होती. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रियंका गांधींनी आपल्या सर्वच सभांमध्ये या मुद्यांवर जोर दिला. तसेच केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ही योजना रद्दबातल करण्याचीही घोषणा केली. याचाही थेट फायदा काँग्रेसला झाला.

बातम्या आणखी आहेत...