आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sexual Harassment With Ukg School Student; Child Abusing In Himachal Una | Himachal News

UKGच्या मुलीशी अश्लील कृत्य:सिक्योरिटी गार्डवर आरोप; पीडितेचा कुटुंबीय म्हणाले- स्कूल व्हॅनमध्ये झाले गैरवर्तन

उना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात एका 4 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील कृत्य व गैरवर्तन केल्याची घटना उजेडात आली आहे. पीडित मुलगी UKGत शिकते. आरोप एका खासगी शाळेच्या सुरक्षा रक्षकावर आहे. त्याने स्कूल व्हॅनमध्ये मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.

मुलीच्या आईने गगरेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या आधारावर पोलिसांनी सिक्योरिटी गार्डविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिस आरोपी सिक्योरिटी गार्डची कसून चौकशी करत आहेत.

आरोपीवर दुसऱ्यांदा आरोप

महिलेच्या तक्रारीनुसार, तिची 4 वर्षीय मुलगी UKGत शिकते. शाळेच्या सिक्योरिटी गार्डने स्कूल व्हॅनमध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य व गैरवर्तन केले. गार्डने यापूर्वी एका मुलीसोबत असे कृत्य केले होते. त्याची तक्रार नातेवाईकांनी शालेय व्यवस्थापनाकडे केली होती.

महिलेने सांगितले की, यावेळी सिक्योरिटी गार्डने त्यांच्या मुलीशी स्कूल व्हॅनमध्ये अश्लील कृत्य केले. दुसरीकडे, एसपी अर्जित सेन ठाकूर यांनी सांगितले की, या प्रकरणी भादंवि कलम 354 व पोक्सो कायदा कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...