आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himanta Biswa Sarma On , Badruddin Ajmal's Controversial Statement; Appeals To Muslim Women |assam News

महिला मुलं निर्माण करणाऱ्या फॅक्ट्री नाहीत:हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लिम महिलांना केले आवाहन - फक्त दोन मुलांना जन्म द्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ऑल युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांच्या हिंदूंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्त्रिया या मुले जन्माला घालण्यासाठीच्या मशीन नाहीत. अजमल केवळ व्होट बँकेसाठी एका वर्गाला खूश करण्यासाठी अशी विधाने करत आहेत, असे सरमा म्हणाले. तसेच बदरुद्दीन अजमल यांनी महिलांनी अधिकाधिक मुले जन्माला घातली पाहिजेत असे म्हटलं आहे. तर जन्माला घातलेल्या मुलांची संगोपनाची जबाबदारी अजमल यांनी घ्यावी, असे आवाहन बिस्वा यांनी केले.

सीएम हिमंता बिस्वा सरमा म्हणाले कीस 'मला माझ्या मुस्लिम बहिणींना सांगायचे आहे की त्यांनी अजमल यांचे ऐकू नका. दोनपेक्षा जास्त मुले होऊ देऊ नका. जर एखाद्या महिलेने अनेक मुलांना जन्म दिला तर त्याचा तिच्यावर शारीरिक परिणाम होईल, इतकेच नाही तर आपल्या समाजावरही त्याचा परिणाम होईल आणि आसाम उद्ध्वस्त होईल.

AJP, तृणमूल आणि भाजपने तक्रार केली
आसाम राष्ट्रीय परिषदेने (AJP) धुब्रीचे खासदार बदरुद्दीन यांच्या विरोधात राज्याच्या विविध भागात तक्रारी दाखल केल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेनेही शनिवारी याप्रकरणी पोलिसांना लेखी निवेदन दिले. याप्रकरणी भाजपने तक्रारही दाखल केली आहे.

बदरुद्दीन अजमल यांनी शुक्रवारी सांगितले होते की, मुस्लिम पुरुष वयाच्या 20-22व्या वर्षी आणि मुस्लिम महिला 18व्या वर्षी विवाह करतात. दुसरीकडे, हिंदू विवाहापूर्वी एक, दोन किंवा तीन अवैध बायका ठेवतात. ते मुलांना जन्म देत नाहीत, एन्जॉय करतात आणि पैसे वाचवतात.

लव्ह जिहादवर म्हणाले- आमच्या मुली घेऊन जा

ते म्हणाले- मुख्यमंत्री हे आज देशातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. मग त्यांना कोण रोखतं? तुम्हीही 'लव्ह जिहाद' करा आणि आमच्या मुस्लिम मुलींना घेऊन जा. आम्ही त्याचे स्वागत करू आणि संघर्षही करणार नाही. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दिल्लीतील एका रोड शोमध्ये सीएम सरमा म्हणाले होते की, भारताला आफताबसारख्या व्यक्तीची गरज नाही, तर भगवान रामसारख्या व्यक्तीची, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्याची गरज आहे.

बदरुद्दीन यांनी मागितली माफी
बदरुद्दीन अजमल यांनी हिंदूंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले- माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला एवढीच इच्छा आहे की सरकारने अल्पसंख्याकांना न्याय द्यावा आणि त्यांना शिक्षण आणि रोजगार द्यावा.

स्मृतींनी विरोधही केला
अजमल यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इराणी म्हणाल्या की, मुलगी कोणत्याही धर्माची असू शकते. या प्रकारची टिप्पणी योग्य नाही. अजमल आपल्या धर्मातील मुलीचा अशा प्रकारे अपमान करत असतील तर विचार करण्याची बाब आहे.

गिरीराज सिंह म्हणाले - बदरुद्दीनसारख्या लोकांनी आम्हाला सल्ला देऊ नये

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले की, बदरुद्दीन आणि ओवैसीसारख्या लोकांनी आम्हाला सल्ला देऊ नये. सनातन धर्मात प्रेमाची नेहमीच उपासना केली जाते. याचे प्रतीक म्हणजे आपला पूर्वज राजा सागर यांना साठ हजार मुलगे होते, तर कृष्णाला 16,000 प्रेमिका आणि पत्नी होत्या. आज भारतात फक्त तेच मुस्लिम आहेत, ज्यांना मुघल काळात मुघलांनी मान दिला नाही.

'असे वक्तव्य बांगलादेशात जाऊन करा'

अजमल यांच्यावर निशाणा साधत आसाममधील भाजप आमदार दिगंत कलिता म्हणाले- तुम्ही मुस्लिम आहात आणि आम्ही हिंदू आहोत. आम्हाला तुमच्याकडून शिकायचे आहे का? ही भगवान राम आणि देवी सीता यांची भूमी आहे. बांगलादेशी लोकांना इथे स्थान नाही. असे विधान करायचे असेल तर बांगलादेशात जा.

भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल म्हणाले की, ते चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करत आहेत. त्याच वेळी, यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, अशा प्रकारचे वक्तव्य अजिबात स्वीकारले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...