आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी स्थलांतरित मुस्लिमांच्या मुलांनी मदरशांमध्ये शिकून जुनाब, इमाम बनण्याऐवजी डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे, असे म्हटले. आसामी हिंदू कुटुंबातील डॉक्टर असतील, तर मुस्लिम कुटुंबातीलही डॉक्टर असावेत. अनेक आमदार असा सल्ला देत नाहीत. कारण त्यांना 'पोमुवा' मुस्लिमांची मते हवी आहेत, असेही बिस्वा म्हणाले. मोरीगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पूर्व बंगाल किंवा बांगलादेशातील बंगाली भाषिक मुस्लिमांना आसाममध्ये 'पोमुवा मुस्लिम' म्हणतात.
बिस्वा यांनी लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांच्या विधानावरही टीका केली. ज्यात त्यांनी हिंदूंना कमी वयात लग्न करून मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. बिस्वा म्हणाले की, भारतात राहणाऱ्या पुरुषाला पहिल्या पत्नीला घटस्फोट देईपर्यंत तीन-चार स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार नाही. जर मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास सांगितले जाते, तर मुलेही असे का करत नाहीत? मुस्लिम मुली शाळेत शिकू शकत नाहीत पण मुस्लिम पुरुष 2-3 स्त्रियांशी लग्न करू शकतात. याला आमचा विरोध आहे. आम्हाला ही व्यवस्था बदलायची आहे. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
मुलांचा खर्च उचलावा
अजमलच्या महिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आसाममध्ये बदरुद्दीन अजमलसारखे काही नेते आहेत. स्त्रियांनी जास्त मुलांना जन्म द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. महिला 20-25 मुलांना जन्म देऊ शकतात. परंतु मुलांच्या अन्न, कपडे, शिक्षण आणि इतर सर्व खर्च अजमल यांनी करावा. तर मग, आम्हाला कोणतीही अडचण नाही.
अत्तर व्यावसायिक ते लोकसभेचा खासदार ते आहेत. असे असूनही ते मुलांचा खर्च उचलू शकत नसतील. तर त्यांना मुलाच्या जन्मावर भाषण देण्याचा अधिकार नाही. आपण जेवढ्या मुलांना खायला देऊ शकतो तेवढीच मुले निर्माण करावीत आणि त्यांना चांगले व्यक्ती बनवावी.
काय म्हणाले होते बद्रुद्दीन अजमल
बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदूंबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, मुस्लीम पुरुष 20-22व्या वर्षी विवाह करतात. मुस्लीम महिला देखील सरकारने निश्चित केलेल्या 18व्या वर्षी विवाह करतात. दुसऱ्या बाजूला हिंदू लग्नाच्या आधी एक-दोन बेकायदेशीर बायका ठेवतात. ज्या मुलांना जन्म देत नाहीत आणि स्वत: आनंद घेतात तसेच पैसे वाचवतात. 40 वर्षानंतर जेव्हा आई-वडीलांच्या दबावापोटी ते (हिंदू) विवाह करतात. यामुळे कोण कशी काय अपेक्षा करू शकेल की 40 नंतर ते मुल जन्माला घालू शकतील. जर तुम्ही चांगल्या पोषक जमीनीवर शेती केली तर पीक चांगले येते. विकास तेव्हाच होतो. त्यांच्या मते हिंदूंनी मुस्लीमांचा फॉर्मुला वापरावा, त्यांनी मुलांचे विवाह कमी वयात करावेत. हिंदूंनी20-22व्या वर्षी विवाह केला पाहिजे. मुलींनी 18-20 व्या वर्षी विवाह करावा, मग बघा कसे खुप मुल जन्माला येतात. अजमल यांच्या या वक्तव्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा अजमल यांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.
वाद वाढल्यावर बदरुद्दीन यांनी मागितली माफी
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी हिंदूंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले- माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला एवढीच इच्छा आहे की सरकारने अल्पसंख्याकांना न्याय द्यावा आणि त्यांना शिक्षण आणि रोजगार द्यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.