आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या:अमृतसर पोलिसांपुढे दिवसाढवळ्या घातल्या गोळ्या, मूर्तींच्या विटंबनेविरोधात देत होते धरणे

अमृतसर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लेखोराच्या कारवर वारिस पंजाब दे चे स्टीकर असून, त्याच्यावर खलिस्तानी अतिरेकी अमृतपाल सिंगचे छायाचित्र आहे.

पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी हिंदू नेते सुधीर सुरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सुरी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी होते. त्यांना पोलिस संरक्षण मिळाले होते. त्यानंतरही त्यांना अमृतसरमधील एका मंदिराबाहेर दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या. हत्येवेळी ते मूर्तींच्या विटंबनेप्रकरणी अमृतसरमधील गोपाल मंदिराबाहेर धरणे देत होते. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून, त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

सुरींवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संदीप सिंग आहे. तो अमृतसरच्या अमन एव्हेन्यूमध्ये राहतो. घटनास्थळी त्याचे कपड्यांचे शोरूम आहे. त्याच्या कारमध्ये अनेक प्रिंटआउट मिळालेत. त्यात हिंदू नेत्यांच्या फोटोंवर क्रॉस करण्यात आल्याच्या खुणा आहेत.

सुरी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा त्यांचे अनेक समर्थक तिथे उपस्थित होते. फायरिंगनंतर त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. सुरी गत काही महिन्यांपासून खलिस्तान समर्थकांच्या निशाण्यावर होते. काही दिवसापूर्वीच परदेशांतील खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. हल्लेखोर आलेल्या कारच्या दर्शनी भागात खालिस्तान्यांचे स्टीकर लावले होते.

सुधीर सुरीच्या हत्येपूर्वी घेण्यात आलेले हे छायाचित्र, त्यात ते धरणे देत असल्याचे (डावीकडे) दिसून येत आहे.
सुधीर सुरीच्या हत्येपूर्वी घेण्यात आलेले हे छायाचित्र, त्यात ते धरणे देत असल्याचे (डावीकडे) दिसून येत आहे.

शहरात तणाव, पोलिस बंदोबस्त तैनात

सुरीच्या हत्येनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरींची हत्या करण्यात आली, याची चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत आरोपीची कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही.

गोळी लागल्यानंतर जमिनीवर कोसळलेले सुधीर सुरी. समर्थक त्यांना घेऊन तत्काळ रुग्णालयात गेले होते.
गोळी लागल्यानंतर जमिनीवर कोसळलेले सुधीर सुरी. समर्थक त्यांना घेऊन तत्काळ रुग्णालयात गेले होते.

छातीत घुसली गोळी, रुग्णालयात मृत्यू

सुरी मंदिराबाहेर निदर्शने करत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांना गोळ्या घातल्या. दोन्ही गोळ्या सुधीर यांच्या छातीत घुसल्या. त्यांना तत्काळ एका प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंदू नेते सुधीर सुरी यांचे संग्रहित छायाचित्र. हल्ल्यावेळी ते अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर आंदोलन करत होते.
हिंदू नेते सुधीर सुरी यांचे संग्रहित छायाचित्र. हल्ल्यावेळी ते अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर आंदोलन करत होते.

हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकांचा गोळीबार

हल्ल्यानंतर सुरी यांना थेट गोळी घालण्यात आली की जवळच्या इमारतीवरून गोळीबार करण्यात आला याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सुरी जखमी झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही हवेत गोळीबार केला. पण आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. ते कोणत्या दिशेने पळून गेले हे ही अद्याप स्पष्ट झाले नाही.

मंदिराबाहेर फेकण्यात आल्या होत्या मूर्ती

समाजकंटकांनी अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर खंडीत मूर्ती ठेवल्या होत्या. या मूर्त्या भाविकांच्या पायात येत होत्या. तसेच त्यांच्याजवळ घाणही पसरली होती. हे पाहून हिंदू नेते सुधीर सुरी व त्यांच्या समर्थकानी मंदिराबाहेर आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन गोपाल मंदिर प्रशासनाविरोधात होते.

सुरीच्या समर्थकांनी हल्लेखोराच्या कारची मोडतोड केली.
सुरीच्या समर्थकांनी हल्लेखोराच्या कारची मोडतोड केली.

हिंदू संघटनेने दिला पंजाब बंदचा इशारा

हिंदू नेते सुधीर सुरी यांच्या मृत्यूनंतर हिंदू संघटनांनी पंजाब बंदचा इशारा दिला आहे. हिंदू नेत्यावर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राज्यात आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...