आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल विधानसभा 2021:हिंदू-मुस्लिम, घुसखोरी, मतुआ मतदारांमुळे नदिया भागात भाजपची ताकद, निम्म्या जागी कमळ फुलणे शक्य!

नदिया (अक्षय वाजपेयी )9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमधील नदियातील 8 मतदारसंघांतून रिपोर्ट, 17 एप्रिलला मतदान

मतुआ मतदार, हिंदू-मुस्लिम समुदाय, नागरिकत्व, घुसखाेरी आणि अँटी इन्कबन्सी या घटकांमुळे भाजप नदियातील बहुतांंश मतदारसंघांत मजबूत पक्ष असल्याचे दिसू लागलेय. येथील शांतिपूर, राणाघाट उत्तर-पूर्व, राणाघाट दक्षिण, चकदार, कल्याणी आणि हरिंघाटा येथे १७ एप्रिलला मतदान हाेणार आहे. येथील बहुतेक सर्व मतदारसंघांत हिंदूंची लाेकसंख्या जास्त आहे. या जिल्ह्यात भाजपची लाेकप्रियता मागील लाेकसभेपासून झाली हाेती. तेव्हा भाजपने एकूण १७ जागांपैकी ११ मतदारसंघांत चांगली आघाडी घेतली हाेती. तेव्हा जिल्ह्यात राणाघाट हा लाेकसभेचा मतदारसंघ हाेता. या निवडणुकीत भाजपने अडीच लाखांनी विजय मिळवला हाेता. यंदाच्या विधानसभेतही भाजपचा मजबूत असा वावर दिसून येताे. या जिल्ह्यात मतुआ समुदायाची जास्त संख्या आहे. मुस्लिम समुदाय कमी आहे. मतुआ समाज भाजपसाेबत दिसून येताे. कारण या समुदायाला भाजपने स्थायी नागरिकत्व देण्याची ग्वाही दिली आहे. नागरिकत्व मिळण्याच्या आधी मतुआ समाजाने भारतीय मतदार नसल्याचे सिद्ध करावे, असे तृणमूलने म्हटले. हेच वादंगाचे कारण ठरू शकते. या सगळ्या गाेष्टी हव्या असल्यास भाजपला मतदान करा. काेणतेही झेंगट नकाे असल्यास तृणमूलला मतदान करा, असे आवाहन तृणमूलने केले. बेकायदा स्थलांतरितांना बाहेर केले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. कारण नदिया बांगलादेश सीमेवर येते. या भागात घुसखाेरी नेहमीच हाेत आली आहे. आता त्यात काहीशी घट झाली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या भागात घुसखाेरी झाली हाेती.

आम्हाला पंचायतच्या मतदानापासून रोखले, आता परिवर्तन हवे
१७ एप्रिलला हाेणाऱ्या ८ मतदारसंघांत भाजप मजबूत दिसून येतेय. भाजपने शांतिपूर मतदारसंघातून जगन्नाथ सरकार यांनाच उमेदवारी दिली आहे. जगन्नाथ हे मूळचे मतुआ समुदायाचे आहेत. लाेकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला सर्वाधिक मतांनी विजयी केले होते. २०१६ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. परंतु अजय डे सलग २० वर्षे आमदार राहिले. तृणमूलने यंदाही डे यांनाच उमेदवार बनवले. परंतु त्यांच्याविरोधात सामान्यांमध्ये नाराजी दिसते. राणाघाट दक्षिणेत मुकुल मनी अधिकारी भाजपचे उमेदवार आहेत. तृणमूलने येथून बरनाली डे यांना मैदानात उतरवले आहे. ध्रुवीकरणामुळे हिंदू मते अधि

बातम्या आणखी आहेत...