आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबादेत मुस्लिम तरुणीशी लग्न करणाऱ्या एका हिंदू तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची सनसनाटी घटना उजेडात आली आहे. शहरातील सरूरनगरात ही घटना घडली. येथे नागराजू नामक तरुणाची त्याच्याच मेहुण्याने रॉड व चाकूने भोसकून खूलेआम हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे.
नागराजू गुरुवारी आपली पत्नी अश्रीन सुलताना हिच्यासोबत दुचाकीवरुन सरूरनगराकडे जात होते. तेव्हा तहसीलदार कार्यालयालगत 2 तरुणांनी भर रस्त्यात त्याच्यावर रॉड व चाकूने हल्ला केला. नागराजूच्या कुटूंबाने सुलतानाच्या कुटूंबावर हत्येचा आरोप केला आहे. या हत्येचे शहरात तीव्र पडसाद उमटले असून, हिंदू संघटनांनी या प्रकरणी पोलिस व प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी केली.
आर्य समाज मंदिरात केला होता विवाह
नागराजू रंगारेड्डी जिल्ह्यातील मरपल्ली गावचा होता. तर सुलताना त्याच्या शेजारच्या घानापूर गावची होती. दोघेही गत 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, सुलतानाचे कुटूंब नागराजूच्या विरोधात होते. त्यामुळे या जोडप्याने 31 जानेवारी रोजी पळून जाऊन लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नानंतर सुलतानाचे नाव पल्लवी असे ठेवण्यात आले.
दोन्ही आरोपी गजाआड
नागराजू कारच्या एका शोरुमध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. 4 महिन्यांपूर्वीच त्याने सय्यद अश्रीन सुलतानाशी विवाह केला होता. स्वतः सुलतानानेही आपला भाऊ व अन्य काहींनी नागराजूवर हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी सुलतानाचे भाऊ व मेहुण्याला अटक करण्यात आली आहे. मृत बिलापुरम नागराजू व त्यांची पत्नी सय्यद अश्रीन सुलताना महाविद्यालयीन मित्र आहेत. दोघांचे मन जुळल्यानंतर त्यांनी गत जानेवारीत लग्न केले. लग्नानंतर सुलतानाचे नाव पल्लवी ठेवण्यात आले. तिचा भाऊ या लग्नामुळे नाराज होता. संभवतः याच कारणामुळे त्याने आपल्या मेहुण्याची हत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
भाजपने केली चौकशीची मागणी
तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. ते म्हणाले -हल्लेखोर कुटूंबातील सदस्य होते, की काही धार्मिक संघटनांनी त्यांना हा सल्ला दिला होता? एखाद्या समुहाने त्यांना आर्थिक मदतीची ग्वाही दिली होती का? या हत्याकांडाची सखोल चौकशी झाली पाहिजे. -----------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.