आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक साैहार्दाचे धडे देणारे गाव:कर्नाटकात हिंदू-मुस्लिम घडवतात देवतांच्या मूर्ती

मनाेरमा सिंह । काेलार (कर्नाटक)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावकरी म्हणाले, आम्ही ईद-गणेशाेत्सव एकत्र साजरे करताे. ही परंपरा आहे

कर्नाटकात एकीकडे धार्मिक कट्टरवादी राजकारण सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे सांप्रदायिक वातावरण बिघडण्याची शक्यता दिसते. कर्नाटकच्या काेलार जिल्ह्यातील शिवरापटना गावाला मात्र अशा घटनांशी देणे-घेणे नाही. तेथील शिल्पकार हिंदू-मुस्लिम यासारख्या गाेष्टींपासून खूप दूर आहेत. शिल्पकार सईद मुवर छन्नी, हाताेडा घेऊन गणेश, हनुमान, शंकर, दुर्गा इत्यादी मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. शिल्प घडवणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. त्यांना यातून सुमारे २० हजार रुपये महिना मिळत असल्याने ते कुटुंबाचे पालनपाेषण करू शकतात. काेराेनाच्या काळात हा व्यवसाय पूर्णपणे बंद हाेता.

परंतु गेल्या काही महिन्यांत या व्यवसायाने पुन्हा गती घेतली आहे. मुनावर म्हणाले, आचार्य शिल्पी त्यागराजाचार्य यांच्यामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रात आलाे. मूर्तीच्या चेहऱ्याला आचार्य शिल्पी हेच अंतिम रूप देतात. त्यानुसार सर्वात शेवटी डाेळे काेरणे, पूजा व मंत्राेच्चारासह प्राणप्रतिष्ठा करण्याचे काम केले जाते. मूर्ती घडवण्याच्या कामात काही नियमांचे पालन केले जाते. उदाहरणार्थ- वर्कशाॅपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे बाहेर काढली जातात. मुनावर हा नियमही पाळतात. त्यांच्याव्यतिरिक्त ८ मुस्लिम बांधव या वर्कशाॅपमध्ये मूर्ती घडवणे, खांब तसेच इतर वस्तूंवरही काम करतात. ३ हजार एवढी गावाची लाेकसंख्या आहे. गावात ३ ब्राह्मण समुदायाची घरे आहेत. ३०० हून जास्त विश्वकर्मा समाजाची आहेत. १०० घरे मुस्लिमांची आहेत. अक्रम तीन भावांसह शेती करतात. हिंदू-मुस्लिमांची एकरुप संस्कृती हा गावाचा वारसा आहे. ते म्हणाले, आमचे विश्व लहान आहे. त्यात ईद, माेहरम, गणेश पूजन, अक्षय तृतीयासारखे सण-उत्सव दाेन्ही समाज एकत्रितपणे साजरे करतात.

शिल्पकला शिवरापटना गावाची ओळख आहे. येथे तयार करण्यात आलेल्या मूर्ती केवळ कर्नाटक, देशातच नव्हे तर परदेशातही जातात. तशी मागणी आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने २०१० मध्ये या गावाला ‘ शिल्पकला ग्राम’चा दर्जा दिला. परंतु त्यांचा शिल्पकारांना लाभ झाला नाही. ७० वर्षीय रामचंद्रनअप्पा यांनी मूर्तिकलेसाठी आयुष्य खर्ची घातले. त्यांचे पुत्र हा वारसा पुढे नेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...