आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्माच्या मुद्द्यावर प्रखर विचार मांडणाऱ्या व राम मंदिर आंदोलनात सुरुवातीपासून असलेल्या साध्वी ऋतंभरा सध्या जयपूरच्या विद्याधरनगरात श्रीमद्भागवत कथा करत आहेत. या वेळी लता खंडेलवाल यांनी त्यांच्याशी धर्म, धर्मांधता, धर्मांतर आदी मुद्द्यांवर केलेली बातचीत...
असे म्हटले जात आहे की, हिंदू-मुस्लिम व समाजांत दरी वाढतेय. यास कोण जबाबदार? - धर्माच्या नावावर एक देश वेगळा केला आणि स्वेच्छेने लोकांनी या देशात बहुसंख्याक हिंदू समाजासोबत राहायचे ठरवले. त्यामुळे त्यांनी दुराग्रहांचा त्याग केला पाहिजे. या देशाच्या मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडले पाहिजे. इथल्या मुस्लिमांचा कोणत्याही आक्रमणकर्त्यांशी संबंध नाही. मात्र, तुम्ही या देशावर अत्याचार करणाऱ्यांसोबत आपली अस्मिता जोडून विचार कराल अन् त्यानंतर कृती करत असाल तर तुम्ही दूध आणि साखर मिसळण्याची प्रक्रिया थांबवत आहात. या देशात हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा एकच मार्ग आहे- श्रीराम आणि श्रीकृष्णाची परंपरा. आमचे पूर्वज एक आहेत, हे सहजपणे स्वीकारल्यास अडचण राहणार नाही. फोटोतून किंवा वक्तव्यातून भावना दुखाव्यात इतका आपला धर्म किंवा श्रद्धा कमजोर आहे का? - सनातन ही अगाध श्रद्धा आहे. ती ना कंसाच्या हुंकाराने मेली, ना रावणाच्या तलवारीने. मग कुणाच्या चेष्टेने कशी काय दुखावली जाईल? तथापि, ही प्रवृत्ती चांगली नाही. कुठे तरी मर्यादेची सीमारेषा ओढावी लागेल. लोक जाणीवपूर्वक भारताची प्रतिमा मलीन करत आहेत. ज्यांची चर्चा होईल असेच मुद्दे सोशल मीडियावर मांडले जातात. श्रद्धेवर आघात करण्याचे काम दीर्घकाळापासून होत आले, पण आता दृष्टी जात आहे. हिंदूंनी खूप सहन केले. बदनामी, हिंदू देवी-देवतांवर वक्तव्ये चित्रपटांत केली आहेत. आता सहन करण्याची मर्यादा संपली आहे. कारण हिंदू सजग झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.