आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशात हिंदूंची स्थिती बिकट होत चालली आहे. तेथून आताही हिंदूंचे भारतात पलायन सुरू आहे. हा वेग कायम राहिला तर येत्या २५ वर्षांत बांगलादेशात एकही हिंदू उरणार नाही. सेंटर फॉर डेमॉक्रसी प्लूरलिझ्म अँड ह्यूमन राइट्सच्या (सीडीपीएचआर) अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
सीडीपीएचआरने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका व तिबेटमधील मानवी हक्कांबाबत हा अहवाल तयार केला आहे. तो शिक्षणतज्ज्ञ, वकील, न्यायाधीश, माध्यमकर्मी व संशोधकांच्या एका समूहाने हा तयार केला आहे. त्यानुसार, ढाका विद्यापीठाचे प्रोफेसर अब्दुल बरकत यांच्या अहवालात दावा केला आहे की, गेल्या ४ दशकांत बांगलादेशातून २.३० लाख लाेक दरवर्षी पलायन करत आहेत.
पाकमध्ये हिंदू-शीख लोकसंख्या २.५% उरली : पाकिस्तानात हिंदू, शीख व ख्रिश्चन अल्पसंख्याकांचे आयुष्य खडतर आहे. त्यांचे जीवन एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. तेथे हिंदू, शीख व ख्रिश्चन तरुणींचे अपहरण, बलात्कार, बळजबरीने धर्मांतर या घटना रोजच घडतात. पाकची लाेकसंख्या २१ कोटी आहे. फाळणीच्या वेळेस धार्मिक लोकसंख्या आधारभूत मानली तर तेथे हिंदू-शिखांची लोकसंख्या ३.५ कोटी असायला पाहिजे होती. मात्र ती केवळ ५०-६० लाख इतकीच आहे. बहुतांश हिंदू-शिखांनी छळाला कंटाळून इस्लाममध्ये धर्मांतर वा पलायन केले. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या हत्या करण्यात आल्या. दुसरीकडे, अफगाणिस्तानातही हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे मानवी हक्क हिरवून घेतले आहेत. देशात १९७० मध्ये ७ लाख हिंदू-शीख होते. आता २०० हिंदू परिवार उरले आहेत. तिबेटमध्येही असेच चित्र आहे. चीनने खूप निर्बंध लादले आहेत. तेथे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व भाषिक ओळख संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मलेशियात हिंदूंची लोकसंख्या ६.४% आहे. मात्र, येथे हिंदूंना मुस्लिमांसारखे समान अधिकार नाहीत. इंडोनेशियात धार्मिक कट्टरता वाढली असून अल्पसंख्याकांना छळले जात आहे. त्यात हिंदू मोठ्या संख्येने आहेत. श्रीलंकेतही धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती चिंताजनक आहे.
बांगलादेशी हिंदू लोकांवरील अत्याचारांमुळे तुलसी संतप्त
भारतीयवंशाच्या अमेरिकी नेत्या तुलसी गबार्ड यांनी बांगलादेशात हिंदूवरील हल्ल्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, तेथे ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत.पाक लष्कराने १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या, बलात्कार व त्यांना हाकलून लावले. ढाका विद्यापीठात रात्रीतून ५ ते १० हजार लोकांची हत्या झाली हाेती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.