आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकी निर्मितीत हीरो जगातील सर्वात मोठी कंपनी. कंपनीचा विमा वितरण उद्योगही देशात सर्वात मोठा. चेअरमन सुनीलकांत मुंजाल यांनी कुटुंब व उद्योगावर एक पुस्तक लिहिले आहे... “हीरो की कहानी : चार भाइयों का औद्योगिक चमत्कार.’ ते म्हणतात, हे व्यवसायासंबंधी पुस्तक नाही, जीवनाची कहाणी आहे. कंपनीला हीरो नाव देण्यापासून हॉकी वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना सायकली भेट देण्यापर्यंत, तिसऱ्या पिढीनंतर उद्योग चालू ठेवण्याशी संबंधित किस्से त्यांनी उपमिता वाजपेयी यांना सांगितले. या चर्चेतील निवडक संवाद...
कुटुंबाच्या व्यवसायात मालक आणि व्यवस्थापन हा भेद कायमचा मिटून जातो...
पुस्तकाचे नाव आहे ‘चार भाईयों का औद्योगिक चमत्कार.’ ‘चमत्कार’ शब्द कशामुळे?
चमत्कार यामुळे, कारण आपण ज्याला “मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस’ म्हणतो, ती या चार भावंडांनी या कंपनीत ६० वर्षांपूर्वी सुरू केली होती. तेव्हा कुणी सल्लागार किंवा कन्सल्टंट नव्हते. त्यात हे भाऊ शिक्षणात साधे कॉलेजातही गेलेले नव्हते. तरीही व्यवसाय वाढवला हा चमत्कारच.
हीरो फॅमिली बिझनेसच्या स्वरूपात ओळखली जाते, यातील आव्हाने आणि फायदे कोणते?
सर्वच फॅमिली बिझनेसमध्ये अडचणी आहेत. मात्र, मोठा फायदा म्हणजे आपण पिढीच्या पातळीवर निर्णय घेऊ शकतो. दर तिमाहीत कुणाला अहवाल द्यायची गरज नसते. मालक व व्यवस्थापन हे अंतर मिटते. तरीही कुटुंबाला आशा असते की हे नाव माझ्या नावामागे लागले तर मी कंपनीचा मॅनेजर होईन. तेव्हा तुम्ही कर्तृत्ववान सोडून कुटुंबातील एखादा मुलगा तेथे बसवता. यामुळे कदाचित नुकसान होते.
९४% कौटुंबिक उद्योग तिसऱ्या पिढीनंतर चालत नाहीत, असे संशोधन सांगते?
हे खरे आहे. साधारणपणे पहिली पिढी व्यवसाय उभारते. दुसरी त्याला उभारी देते आणि तिसरी तो व्यवसाय घालवते. आम्ही कुटुंबात प्रत्येक पिढीला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या क्षमतेनुसार चांगले प्रशिक्षण किंवा संधी दिली. माझ्यानंतरच्या पिढीत त्यांच्या आवडीचे काम करण्याची सूट दिली. उद्योगात यायचे असेल तर पात्रता सिद्ध करावी लागेल हेही सांगितले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एखाद्या दुसऱ्या कंपनीत काम करावे लागेल. नंतर हवे तर ते आमच्या कंपनीत येऊ शकतात. त्यांना खालच्या स्तरावरून काम सुरू करावे लागेल. जेणेकरून केवळ नावावर नव्हे, कामगिरीनुसार पदोन्नती मिळवता येईल. त्यांनी हे प्रशिक्षण घेतले त्यांच्यात हा फरक दिसतोच.
भारतीय संघ हॉकी वर्ल्डकप जिंकून आला तेव्हा त्यांना सायकली भेट दिल्या, तो काय किस्सा आहे?
तेव्हा ही संस्कृती नव्हती. भारतीय संघ हॉकी वर्ल्डकप जिंकून आला होता. तेव्हा जे खेळाडू होते त्यांच्याकडे स्वत:च्या सायकलीही नव्हत्या. म्हणून याला चमत्कार म्हटले आहे. क्रीडा संस्कृतीचा आम्ही आमच्यात समावेश केला तेव्हाच आमच्या ब्रँडची प्रतिष्ठा वाढली.
सायकलचा काळ होता तेव्हा नंबर वन, आता दुचाकीतही अव्वल, ही सवय कशी पडली?
आमचे पूर्वज सांगत, जे करायचे ते मन लावून करा. अगोदर नियोजन करा. तेव्हा १२८ कंपन्यांना सरकारने एक दिवसात सायकली तयार करण्याचे परवाने दिले होते. वडिलांनी तो परवाना सरकारला परत केला. आम्हाला व्यवसाय करायचाय, पण बंधने नकोत, असे त्यांनी बजावले. या वर्षी नेमका व्यवसाय किती वाढवायचा यावर चर्चा करायची हे आमच्या वार्षिक सभेत ठरले होते. पुढे जायचे की नाही, यावर नव्हे... पुढे जायचेच या मुद्द्यावर चर्चा करण्याचे ठरले होते.
कोविडने कंपन्यांना तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शिकवले
जीवनाबद्दल : नात्यांना महत्त्व देण्याचे शिकलो, मी उद्या नसेन तेव्हा लोकांच्या मी कायम आठवणीत राहीन असे काय करू, याचा विचार सुरू केला. आम्ही लोकांना समक्ष भेटलो नसूत, परंतु त्यांच्याशी नाती घट्ट होत गेली. निसर्गाबद्दलही विचार सुरू केला... कारण त्याचे संरक्षण आणि पर्यावरण सांभाळलेच पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.