आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:ऑल-टाइम हिट चित्रपट "द शॉशँक रिडेम्प्शन" चे धडे, अडचणींवर मात करून मार्गक्रमण करा

शिक्षणतज्ज्ञ, संदीप मानुधने17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"होप इज अ गुड थिंग, अँड नो गुड थिंग एव्हर डाइस" - अँडी दुफ्रेन (एक पात्र)
अर्थात आशावाद एक चांगली गोष्ट आहे, आणि कोणतीही गोष्ट लयास जात नाही.

करिअर फंडात स्वागत!

चांगल्या बॉलिवूड व हॉलिवूड चित्रपटांतून खूप काही चांगले शिकते येते हे मी नेहमीच सांगतो. आपल्या चांगल्या प्रोफेश्नल जीवनासाठी, या, आज आणखी एका चांगल्या चित्रपटावर बोलूया...

1994 मध्ये फ्रँक दराबॉंट दिग्दर्शित, द शॉशँक रिडेम्प्शन (The Shawshank Redemption) ही एका बँकरची कथा आहे. त्याच्यावर त्याची पत्नी व प्रियकराची निघृण हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. पण जन्मठेप भोग्यासाठी तुरुंगात गेल्यानंतर (शॉशँग नामक जेल) त्याला आपल्या शक्तीची जाणिव होते.

“द शॉशँक रिडेम्पशन” चित्रपटातून प्रोफेश्नल लाइफसाठी 7 धडे

1) दुर्दैवाशी कुणाचीही कधीही गाठ पडू शकते - अँडीचे आयुष्य रातोरात उद्ध्वस्त होते. तेही त्यांनी न केल्ल्या गुन्ह्यासाठी. तुरुंगात पोहोचल्यानंतर त्याला यातना, क्रौर्य, मित्रांची उणीव, एकटेपणा, शारीरिक अत्याचार आदी भयंकर स्थितींचा सामना करावा लागतो. पहिल्याच महिन्यात त्याला आपल्याला रडून मरावे लागेल किवा आयुष्यात हळूहळू सुधारणा करावी लागेल याची जाणीव होते. तो दुसरा मार्ग निवडतो. धडा - आपण रडत बसायचे की जीवनात संघर्ष करायचा हे आपण स्वतः ठरवायचे आहे.

2) मोठे प्रकल्प छोट्या तुकड्यांत करावे लागतात - "अँडी पहिल्याच दिवशी ठरवतो की, जो गुन्हा आपण केलाच नाही, त्याची शिक्षा मी भोगणार नाही." त्यानंतर तो तुरुंगात भूयार खोदणे सुरू करतो. तो रोज मूठभर माती काढतो. त्यावेळी त्याचा तुरुंगातील मित्र एलिस रेड त्याची योजना ऐकून हसतो. त्याला वाटते अँडी थट्टा करत आहे. कारण, छोट्या हातोड्याने हे काम करण्यासाठी किमान 600 वर्षे लागतील असे त्याला वाटते. धडा - एक मोठा प्रकल्प छोट्या-छोट्या तुकड्यातून पूर्ण होतो. पण संयम हवा.

3) आशेचा दिवा विझू देऊ नका – अँडी सुशिक्षित होता. त्यामुळे तुरुंगातील एक ग्रंथालयात त्याला सुधारणा करावयाची होती. पण समस्या पैशांची होती. त्यासाठी अँडीने स्थानिक विधानसभेला पत्र लिहून निधीची मागणी करतो. सर्वजण त्याला वेड्यात काढतात. पण अँडी याचा पाठपुरावा करतो. आणि एकेदिवशी त्याला पुस्तकांचा एक मोठा संग्रह पाठवला जातो. धडा - तुम्ही आशा सोडली नाही, तर दुसरेही तुमच्यासोबत येतात.

4) मित्रांचा सन्मान करा – अँडीने आपली मदत करणाऱ्या सर्वांसाठी काही न काही केले. अखेरीस तुरुंगातून पळून गेल्यानंतर आपल्या सर्वात चांगल्या मित्रांनाही तो आपल्याकडे बोलावतो. त्याची इच्छा असती तर तो शांतपणे एकटा पळून गेला असता. मौजमजा केली असती. पण कायद्याने पेरोलवर सुटलेल्या आपल्या मित्रांनाही तो आपल्याकडे बोलावतो. धडा - मित्रांचा सन्मान करा. आपला आनंद व संधी त्यांच्याशी सामायिक करा.

5) मेंदूचा वापर करण्यास विसरू नका - चित्रपटात तुरुंगातील वॉर्डन अँडीच्या आर्थिक युक्त्यांचा स्वतःचे उखळ पांढरे करवून घेण्यासाठी करतो. अँडीही त्याला शांतपणे मदत करतो. त्यावर कोणताही आक्षेप घेत नाही. असे केल्यास आपल्याला केवळ नुकसान सोसावे लागेल, पण मदत करत राहिल्यास आपले वजन अबाधित राहील हे त्याला माहिती असते. धडा - तुमचे कौशल्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याला पॉलिश करत राहा.

6) अंधारात स्वतः हरवून जाऊ नका – अँडी एका नकारात्मक वातावरणात तब्बल 20 वर्षे राहतो. पण एक व्यक्ती म्हणून तो आपला चांगूलपणा केव्हाच सोडत नाही. तो कुणालाही त्रास देत नाही. त्याची मानवता जिवंत राहते. धडा - स्वतःमधील माणूस मारणे किंवा जिवंत ठेवणे, हे आपली चॉइस असते.

7) चांगली गोष्ट स्वतःच एक बक्षीस असते – अखेरीस मी सांगतो की, या चित्रपटाला प्रारंभी चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण हळूहळू पुढील काही वर्षांत त्याची गणना हॉलिवूडच्या सर्वात चांगल्या चित्रपटांत होऊ लागली. धडा - चांगले काम करा व बाकीचे नशिबावर सोडा.

तर आजचा करिअर फंडा हा आहे की, आपल्या प्रोफेश्नल व विद्यार्थी दशेतील स्थायी आशावाद एक आशीर्वाद असतो.

आचा व्हिडिओ पाहा, व फिडबॅक द्या.

करून दाखवू या!

बातम्या आणखी आहेत...