आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-कश्मीर पोलिस विभागाची तपास यंत्रणेने (एसआयए) एका पाकिस्तानी संस्थेत प्रवेश घेणारा भारतीय विद्यार्थी व त्याच्या वडिलांसह ३ लोकांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी मंगळवारी सांगितले, दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत डोडातील कश्तीगडचा रहिवासी विद्यार्थी आसिफ शाबीर नाइक, त्याचे वडील शब्बीर हुसेन नाइक आणि सफदर हुसेनविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात शब्बीर व सफदर सध्या पाकिस्तानात आहेत. ते सर्व हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित आहेत. आसिफ शब्बीरला इस्लामाबाोत इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीत जनसंवादाचा विद्यार्थी दाखवले, परंतु तो हिजबुलच्या मीडिया युनिटमध्ये काम करत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.