आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर:हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मसूदसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पोलिसांनी डोडा जिल्हा अतिरेकीमुक्त घोषित केला 

अनंतनाग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लष्कर-ए-तोयबाचा एक डिस्ट्रिक्ट कमांडरही मारला गेला, एके-47 आणि 2 पिस्तूल हस्तगत
  • 4 दिवसात 2 एन्काउंटर, 6 दहशतवाद्यांचा खात्मा, 26 जूनला पुलवामामध्ये 3 दहशतवादी मारले गेले

अनंतनाग जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्य आणि पोलिसांना सातत्याने यश मिळत आहे. सोमवारी अनंतनाग जिल्ह्यातील खुलचोहर भागात सुरक्षा दलाने 3 अतिरेकी ठार केले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, मारलेल्या अतिरेक्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर आणि एक हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर, मसूद यांचा समावेश आहे. डीजीपी म्हणाले की, जम्मू विभागातील डोडा जिल्हा पुन्हा एकदा अतिरेकी मुक्त झाला आहे.

मसूद हा डोडा जिल्ह्यातील शेवटचा दहशतवादी होता. तो डोडा येथील एका बलात्काराच्या प्रकरणात सहभागी होता. त्या घटनेनंतर तो फरार झाला होता. नंतर हिजबुल मुजाहिद्दीनसोबत सामील झाला आणि काश्मीरमधून दहशतवादी कारवाया करण्यास सुरूवात केली.

खुलचोहर चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची एके 47 रायफल आणि 2 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री 11 वाजता सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. सोमवारी पहाटे चार वाजता चकमक सुरू झाली.

29 दिवसांत 17 चकमकी, 49 दहशतवादी ठार
यापूर्वी 26 जून रोजी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. या महिन्यात 17 चकमकींमध्ये आतापर्यंत 49 दहशतवादी ठार झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...