आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Holi Celebration Across India Ujjain Mahakal Temple, Colorful Holi In Mathura । Holi At Varanasi

VIDEO देशभरात होळीचा उत्साह:उज्जैनच्या महाकाल मंदिरात महापूजा, मथुरेत बांके बिहारीच्या दर्शनाला अलोट गर्दी अन् वाराणसीत आनंदाच्या रंगांची उधळण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देशात आज धूलिवंदनाचा उत्साह दिसून येत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आनंद आणि जोशाच्या रंगांनी आसमंत व्यापून टाकला आहे. देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळांवरही होळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने पूजापाठ सुरू आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैन, मथुरेतील वृंदावन आणि वाराणसीतही पुजाऱ्यांनी या रंगांच्या सणानिमित्त देवतांची विधिवत पूजा करण्यात आली. होळीच्या सणानिमित्त या सर्वच ठिकाणी भाविकांनी तोबा गर्दी केली होती.

उज्जैनमध्ये भगवान महाकालाच्या पिंडीला दुग्धाभिषेकाआधी विविध लेप लावून लावण्यात आले होते. यावेळी पुजाऱ्यांनी मंत्रोच्चाराच्या गजरात महाकालाची पूजा केली. असाच उत्साह मथुरेतही पाहायला मिळाला. येथे बांके बिहारी मंदिरात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. यावेळी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मथुरेतील होळीत सहभागी होण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावरही या सणाच्या निमित्ताने भाविकांची रेलचेल दिसली. गंगेच्या किनाऱ्यावर लोकांनी एकमेकांना रंग लावून धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...