आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वसंत पंचमीला मंगळवारी स्तंभारोपण केल्यानंतर वृंदावनमध्ये ४० दिवसांचा होलिकोत्सव सुरू झाला. बांके बिहारी मंदिरात गुलालाची जोरदार उधळण झाली. कोरोनानंतर वृंदावनचा हा पहिला उत्सव आहे. तेथे भाविकांची संख्या गेल्या वसंत पंचमीपेक्षा दुप्पट आहे. गेल्या वर्षी होळीच्या आधी देशात कोरोना आला होता. तेव्हाही ब्रजमध्ये होळी सामान्य रूपात साजरी झाली होती. वसंत पंचमीच्या दिवशी वृंदावनमध्ये ३०-४० हजार भाविक होते. यंदा हा आकडा ८० हजार ते एक लाखापर्यंत गेला आहे.
संपूर्ण ब्रज भागात (मथुरा ते गोकुळ, नंदगाव ते बरसाना आणि गोवर्धनपर्यंत) उत्साह आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले, मंगळवारपासूनच हरिद्वार कुंभपूर्व वैष्णव बैठक म्हणजे लघु कुंभ सुरू झाला आहे. दुसरे, वृंदावनमध्ये नवे वर्ष सुरू झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण जवळपास नाहीतच. मथुरेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. कुंभ भागात कोरोना तपासणीसाठी केंद्र तयार केले आहे. वृंदावनच्या यमुना तीरावर ८ किलोमीटर भागात कुंभनगरी वसवण्यात आली आहे. पहिले शाही स्नान माघ पौर्णिमेला (२७ फेब्रुवारी) आहे. यमुना एक्स्प्रेस-वे आणि दिल्ली-आग्रा हायवेवरून वृंदावनला येणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी आहे. वर्षभरानंतर वृंदावनमधील धर्मशाळा, गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये मोठी वर्दळ आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.