आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Holi Has Not Been Celebrated In Korba District Of Chhattisgarh For Hundreds Of Years News And Updates

दिव्य मराठी विशेष:छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात साजरी होत नाही शंभर वर्षांपासून होळी; खरहरी गावाला होळी, रंग-पिचकारीचे वावडे

रायपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नववधूही राहते रंगाविना, पण सासरी रंग खेळण्याची मुभा

होळी-रंगोत्सव म्हटल्याबराेबर रंग-गुलाल, पिचकारी, ढाेल-नगारे व पारंपरिक गीते डाेळ्यासमाेर येतात. परंतु छत्तीसगडमधील काेरबा जिल्ह्यातील खरहरी गाव त्याला अपवाद आहे. या गावात हा सणाेत्सव साजरा हाेत नाही. येथील मुलांना दिवाळी, रक्षाबंधन, दसरा हे सण माहिती आहेत. हे सण ते चांगल्या प्रकारे साजरेही करतात. परंतु हाेळीचे नाव घेताच त्यांचे चेहरे भावशून्य हाेतात. ८-१० वर्षांच्या मुलांना हाेळीबद्दल काहीही माहिती नाही. गावात हाेळीचे दहन हाेत नाही. रंगही खेळला जात नाही. १०० वर्षांपासून गावात हाेळी-रंगाेत्सव साजरा हाेत नाही. यामागे अंधश्रद्धेचे कारण सांगितले जाते. गावात रंग खेळला तर आजार किंवा महामारी पसरेल, असे गावकऱ्यांना वाटते.

हाेळीचे दहन केल्यास गावातील घरांना आग लागेल, असे त्यांना वाटते. या धारणेमुळे या लाेकांच्या जीवनातून रंग जणू गायब झाले आहेत. ‘भास्कर’ च्या टीमने खरहरी गावाला भेट दिली. तेव्हा ६५-७० वर्षीय वयस्करांपासून तरुण व मुले घरासमाेर बसलेले हाेते. लहान मुले खेळत हाेती. हाेळी साजरी केली जात नसल्याच्या परंपरेबद्दल वृद्धांना विचारले. लहानपणी एक गाेष्ट एेकली हाेती. गावातील एका व्यक्तीने रंग खेळला. तेव्हा त्याच्या शरीरावर फाेड आले. त्यामुळे काेणीही खेळत नाही. गावातील ६६ वर्षीय फुलसिंह म्हणाले, हाेळीमुळे गावात आग लागते, म्हणून आम्ही लहानपणापासून कधीही रंग खेळलाे नाही. गावातील दुकानातही गुलाल-रंगाची विक्री केली जात नाही. िपचकारीदेखील दिसत नाही. छत्तीसगड अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डाॅ. दिनेश मिश्रा म्हणाले, गावकरी केवळ अंधश्रद्धेमुळे ही परंपरा चालवत आहेत. लाेकांना जागरूक करण्यासाठी समिती गावाला भेट देईल आणि हाेळीबद्दल जनजागृती करू.

नववधूही राहते रंगाविना, पण सासरी रंग खेळण्याची मुभा
गावात विवाह करून आलेल्या नववधू २८ वर्षीय फुलेश्वरीबाई यादव म्हणाल्या, विवाह हाेण्याआधी हाेळी व रंगाेत्सव साजरा करत हाेते. परंतु लग्नानंतर हाेळी साजरी करत नाही. माझ्या मुलांनाही त्याची माहिती नाही. या गावातून दुसरीकडे नांदायला गेलेल्या मुली मात्र तेथे हाेळी, रंगपंचमीत सहभागी हाेतात. परंतु त्याच मुली माहेरी आल्यावर रंग खेळू शकत नाहीत. गावपंचायतीचे प्रमुख संताेषसिंह कंवर म्हणाले, हाेळीच्या दिवशी गावात प्रत्येकाच्या घरी चांगली पक्वान्ने तयार केली जातात. ते शेजाऱ्यांना वाटले जाते.

बातम्या आणखी आहेत...