आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात महागड्या क्रिकेट टूर्नामेंट इंडियन प्रीमिअर लीगला (IPL) धडाक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमुळे अनेकांच्या जीवनाचे सोने झाले आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या एका होमगार्डसोबत घडली आहे. विवेकानंद नामक हा होमगार्ड आयपीएलमुळे अवघ्या काही तासांत कोट्यधीश बनला. एवढेच नाही तर त्याला एक आलीशान लक्झरी कारही मिळाली आहे.
आयपीएल्या 16 व्या हंगामात विविध ऑनलाईन गेमिंग अॅप्स सक्रिय झालेत. या अॅप्सच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना आपली आवडती टीम तयार करून पैसे कमावण्याची संधी मिळते. त्यांना किमान 1 ते कमाल 20 टीम लावता येऊ शकतात.
₹30 लावले अन् जिंकले 1 कोटी
सर्वाधिक लोकप्रिय कॉन्टेस्टमध्ये युजर्सना 49 रुपये लावून 2 कोटी जिंकता येतात. त्याच प्रकारे 30 रुपयांत 1 कोटींचे बक्षीस मिळते. विवेकानंद यांनी 30 रुपयांच्या कॉन्टेस्टमध्ये टीम लावून तब्बल 1 कोटींचे बक्षीस जिंकले.
छोट्या मुलांनी शिकवले होते टीम लावणे
गोरखपूरच्या सिकरीकंज ठाण्यात तैनात ड्रायव्हर विवेकानंद सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच गेमिंग अॅपची माहिती घतेली होती. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या काही लहान मुलांनी त्यांना या अॅपवर टीम कशी लावायची हे शिकवले होते. त्यानंतर ते गत 2 महिन्यांपासून सातत्याने या गेमिंग अॅपवर टीम लावत होते.
8 हजार रुपये बुडाले
विवेकानंद सिंह बहुतांशवेळा 49 ते 150 रुपयांपर्यंत पैसे लावत होते. त्याहून अधिक पैसे केव्हाच लावले नाही. पण त्यांनी त्यात सातत्य ठेवले. यामुळे गत काही महिन्यांत त्यांचे 7 ते 8 हजार रुपये बुडाले. पण त्यांच्या नशीबात करोडपती होण्याचे लिहिले होते. त्यामुळे त्यांनी पैसे गेले तरी टीम लावणे सोडले नाही. त्यांनी सोमवारी रात्री चेन्नई विरुद्ध लखनऊच्या सामन्यावरही पैसे लावले.
डोळे उघडले अन् करोडपती झाले
विवेकानंद सिंह म्हणाले, ''मी सामना सुरू होण्यापूर्वी टीम लावली. त्यानंतर दैनंदिन कामात व्यस्त झालो. त्यानंतर 9 वा. जेवण करून झोपलो. मध्यरात्री 12 च्या सुमारास जाग आल्यानंतर मी फोन पाहिला. त्यावर एक मेसेज होता. त्यात मी 1 कोटी जिंकल्याचा संदेश होता. तसेच मला 1 लक्झरी कार मिळाल्याचेही त्यात नमूद होते.''
8 एप्रिल रोजी मिळणार रक्कम
हा मेसेज पाहताच विवेकानंद सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना प्रथम यावर विश्वासच बसला नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांना अॅपकडून फोन आला. त्यात त्यांना त्यांनी जिंकलेल्या बक्षीसाची माहिती देण्यात आली. तसेच एक फोटो उपलब्ध करवून देण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली. अॅपच्या अधिकाऱ्यांनी विवेकानंद यांच्या खात्यात येत्या 8 तारखेला बक्षीसाची रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले.
अभिनंदनाचा वर्षाव
2 भाऊ व 2 बहिणींत सर्वात धाकटे असणाऱ्या विवेकानंद सिंह यांचे नशीब फळफळले आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्या विभागातील कर्मचारीही त्यांचे तोंड भरून कौतुक करत आहेत. तसेच आयजी कार्यालयानेही त्यांचे खास अभिनंदन केले आहे. विवेकानंद यांचे वडील शेतकरी होते. ते आता या जगात नाहीत.
शेतीत पैसे गुंतवणार
होमगार्ड विवेकानंद सिंह यांनी सांगितले की, ते बक्षीसाची रक्कम गेमिंग अॅपमध्ये गुंतवणार नाहीत. त्यांचा चांगल्या ठिकाणी वापर करतील. विशेषतः शेतीमध्ये त्याचा सुयोग्य वापर करतील. यातून ते स्वतःसाठी एक घरही बांधणार आहेत.
गेमिंग अॅपशी संबंधित खालील बातमी वाचा...
रंकाचा राव:49 रुपयांत भाड्याने राहणारा ड्रायव्हर बनला कोट्यधीश; IPLच्या कोलकाता Vs पंजाब सामन्याने नशीब फळफळले
कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगात 'रावाचा रंक' व 'रंकाचा राव' झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील एका तरुणासोबतही असाच काहीसा प्रसंग घडला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर व किरायाच्या खोलीत राहणारा हा तरुण रातोरात कोट्यधीश बनला आहे.
या तरुणाने अवघ्या काही तासांतच ऑनलाइन गेमिंग ॲपवरुन कोट्यवधी रुपये कमावले. यामुळे तो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.