आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या राम मंदिर:अयोध्येत घर, व्यवसायाची इच्छा; जमिनीच्या किमतीत चारपट वाढ

विजय उपाध्याय । अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 क्षेत्रांत जमिनीच्या किमतीत अंतर

अयोध्या धर्म व अध्यात्माचे वैश्विक केंद्र होऊ लागले आहे. देश-विदेशातील लोक आता येथे आपले घर, हॉटेल, लॉज, धर्मशाळा बनवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी केंद्र-राज्याच्या योजनाही प्रस्तावित आहेत. त्यामुळेच अयोध्येच्या परिसरातील जमिनीच्या किमती चारपटीने वाढल्या आहेत.

खरेदी-विक्रीसाठी स्थानिक रजिस्ट्री कार्यालयात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. उपनिबंधक एस. बी. सिंह म्हणाले, अयोध्येच्या जवळील मांझा, बरेहटा व सहजनवां येथे राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. काही ठिकाणी ती प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरचा निकाल आल्यानंतर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जमिनीचे भाव दोन ते चार पटीने वाढले आहेत. कोरोनामुळे विकास कार्य काहीसे मंदावले आहेत. ही मरगळ राम मंदिर भूमिपूजनानंतर निघून जाईल, असा अंदाज आहे.

अयोध्या-गोरखपूर महामार्गावर ६०० एकर भागात राज्य सरकारची सर्वात मोठी टाउनशिप, २०० एकरमध्ये इकछुवाक सिटी, १०० एकरमध्ये भगवान रामाची सर्वात उंच मूर्तीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. आंतरराष्ट्रीय रामलीला स्थळ, रामशोध केंद्र इत्यादी योजनांसाठी जमिनीची गरज भासणार आहे. रामाच्या भव्य मूर्तीसाठी आवश्यक आदेशही जारी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी संजीव म्हणाले, अयोध्येचा गौरवशाली इतिहास भव्य आणि आधुनिक स्वरूपात समोर यावा, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यासाठी शहराचा विकास केला जाणार आहे. अयोध्येत लोक संपूर्ण कुटुंबासह सुटी घालवण्यासाठी येतील.

४ क्षेत्रांत जमिनीच्या किमतीत अंतर

शहरी क्षेत्र: ६ हजार ते १५ हजार रुपये प्रति चौरस मीटर. बाजार मूल्य १० ते २५ हजार रुपये प्रति चौरस मीटर

ग्रामीण भाग : रस्त्याच्या कडेला असलेली जमीन- ३५०० ते ८००० प्रति चौरस मीटर. बाजारमूल्य ७ ते २० हजार रुपये प्रति चौरस मीटर.

महामार्गाला लागून कृषी जमीन: ५८ लाखांहून ३.०४ कोटी रुपये प्रति चौरस मीटर. बाजारमूल्य १.२५ कोटी ते १३ कोटी रुपये प्रति चौरसमीटर.

अयोध्येचा बाहेरील परिसर : रस्त्यापासून १० किमी अंतरावरील जमीन ३ हजार ते ८२०० रुपये प्रति चौरस मीटर. बाजारमूल्य ७ हजार ते २५ हजार रुपये चौरस मीटर.

बातम्या आणखी आहेत...