आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Home Minister Amit Shah And Smruti Irani Rally In Bengal; A Day Earlier 5 TMC Leaders Joined BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये भाजपचा 'राम बाण':स्मृती इराणी म्हणाल्या- 'ममता दीदींनी भगवान श्री रामांचा त्याग केला, पण बंगालमध्ये राम राज्य येत आहे'

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप बंगालमध्ये मोठा बदल घडवून आणले- अमित शहा

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये रविवारी भाजपची मोठी रॅली झाली. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंचावरुन भाषण केले, तर बंगाल दौरा रद्द केल्यामुळे अमित शाह यांनी व्हर्चुअल स्पीच दिली. यावेळी स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. स्मृती इराणी म्हणाल्या- ममता दीदींनी श्री रामांचा त्याग केला, पण बंगालमध्ये लवकरच राम राज्य येणार आहे

'कोणताच रामभक्त तृणमूलमध्ये थांबू शकत नाही'

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'जो पक्ष स्वार्थासाठी केंद्राशी वैर धरतो, जो रामाच्या नावाचा अपमान करतो, त्या पक्षात कोणताच राम भक्त एक मिनीटही थांबू शकत नाही. नागरिकांना माहिती, जोपर्यंत तृणमूलमध्ये 'कट मनी' येत नाही, तोपर्यंत कोणतेच काम होत नाही. बंगालने मागीलकाही दिवसात फक्त कोरोनाचा नाही, तर 'अम्फान' वादळाचाही सामना केला. त्यावेळेस केंद्राने 11 दिवस आधी राज्याला अलर्ट दिला होता, पण ममता सरकारने याकडे दुर्लक्ष केले. ज्या भारतीय सैन्यचा तुम्ही अपमान केला, त्यांनीच तुमची मदत केली.'

स्मृती इराणी यांच्यानंतर अमित शाह म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी 'मां, माटी और मानुष' अशी घोषणा केली होती. आज ही घोषणा गायब झाली आणि आज राज्यात हुकूमशाही आणि अशांतता पसरली. शाह पुढे म्हणाले की, बंगालमध्ये 10 वर्षांपूर्वी कम्युनिस्टांनंतर जो बदल घडायला हवा होता, तो बदल आजा भाजप सत्तेत आल्यावर घडेल.

'मोदी सरकारच्या योजना राज्यात येऊ दिल्या नाही'

अमित शाह पुढे म्हणाले की, 'नरेंद्र मोदी सरकारला बंगालच्या जनतेने पुन्हा आशीर्वाद दिला. 6 वर्षांच्या आत मोदी सरकारने गॅस, घर, शौच्छालय आणि पिण्याचे पाणी दिले. याशिवाय, 5 लाख रुपयापर्यंतची आरोग्य सुविधा नागरिकांपर्यंत पोहचावी, असे मोदींना वाटत होते. पण, ममता बॅनर्जी यांनी ती राज्यात येऊ दिली नाही. जन-धन योजनेचा संपूर्ण देशात फायदा होत आहे, पण बंगालच्या जनतेला ममता यांनी यापासून वंचित ठेवले आहे. या सर्व योजना मोदी सरकारच्या असल्यामुळे ममता बॅनर्जी त्या तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. बंगालमध्ये आमचे सरकार आल्यावर सर्वात पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्ही राज्यात आयुष्मान योजना लागू करू.'

'ममता बॅनर्जी पक्षात एकट्याच राहतील'

शाह पुढे म्हणाले की, 'ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून लोक भारतीय जनता पार्टीत येत आहेत, असे वाटत आहे की, निवडणूक येईपर्यंत तृणमूलमध्ये फक्त ममता दीदी राहतील. त्यांच्या त्यांच्या पक्षातील कोणीच साथ देणार नाही. ममता यांनी विचार करावा की, लोक त्यांची साथ सोडून का जात आहेत. '

शनिवारी तृणमूलला मोठा झटका

काल(दि.30) ममता बॅनर्जी यांना मोठा झटका लागला. त्यांच्या पक्षातील 5 मोठ्या नेत्यांनी तृणमूलमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यात बंगालचे माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार बैशाली डालमिया, आमदार प्रबीर घोषाल, हावडाचे माजी महापौर रतिन चक्रवर्ती, रानाघाटचे माजी महापौर पार्थसारथी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय, अभिनेता रुद्रनील घोषनेही भाजपमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...