आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली.

अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, 'कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी टेस्ट केली आहे. यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी रुग्णालयात दाखल होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, जे लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन तपासणी करुन घ्यावी.'

बातम्या आणखी आहेत...