आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Home Minister Amit Shah Discharged From Post Covid Care Center AIMS After Corona Report Negative

रुग्णालयातून सुटी:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज; कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जाणवत होता त्रास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुक्त झाल्यानंतरही सुरू होत्या अंगदुखी थकवा आणि चक्कर येण्याच्या समस्या

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना सोमवारी सकाळी एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 55 वर्षीय शहा यांना 18 ऑगस्ट रोजी एम्सच्या पोस्ट कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अंगदुखी, थकवा आणि सतत चक्कर येण्याच्या समस्या उद्भवत होत्या. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या निरीक्षणाखाली गृहमंत्र्यांवर उपचार करण्यात आले.

14 ऑगस्ट रोजी आला होता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

विशेष म्हणजे, 2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 14 ऑगस्ट रोजी त्यांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तरीही विविध प्रकारच्या समस्या उद्भवल्याने त्यांना 18 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता वाढून 36,19,169 झाी आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 79,457 नवीन कोरोना रुग्ण सापडले. यापूर्वी शनिवारी सुद्धा सर्वाधिक 78,479 कोरोना रुग्ण सापडले होते. तसेच 960 जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी covid19india वरून घेण्यात आली आहे.