आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार विधानसभा निवडणुक:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची व्हर्च्युअल रॅली आज; विरुद्ध राजदचा थाळीनाद

नवी दिल्ली / पाटणा2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • राजद नेते तेजस्वी म्हणाले, मृत्यूचेही सोहळे साजरा करतोय भाजप

कोरोना साथरोगाच्या संकटात बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली काढणार आहेत. भाजप या रॅलीची गेल्या महिनाभरापासून तयारी करत आहे.

यात मोदी सरकारच्या २.० मधील एक वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या यशस्वी कामगिरीवर मुख्य रोख असणार आहे, तर बिहारमध्ये विरोधी पक्ष असलेल्या राजदने पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना रॅलीच्या विरोधात रविवारी थाळीनाद करण्याचे आवाहन केले आहे.

राजद नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी भाजपवर भगव्या पक्षाला फक्त निवडणूक जिंकायची असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप मृत्यूचेही सोहळे साजरे करतो आहे, तर दुसरीकडे या राज्यातील जनता भूक व बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडत आहे. तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना टोला लगावताना म्हटले, नितीशकुमार सुरा खुपसण्यात व दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्यात तरबेज अाहेत. त्यांना जनतेची काळजी नाही.

तेजस्वी यादव यांनी राजदच्या प्रदेश कार्यालयात नवे पोस्टर प्रसिद्धीस दिले असून यात पोलिस मुख्यालयाचे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात बाहेरच्या प्रांतातून आलेले बिहारी मजूर राज्यासाठी धोकादायक असल्याचा उल्लेख आहे.

बिहारमध्ये बाहेरुन आलेल्या मजुरांना प्रवेश करू देणाऱ्यावरूनही नितीशकुमारांवर राजदने टीकास्त्र सोडले होते. विरोधकांत व सत्ताधाऱ्यांत या प्रश्नांवर चांगलीच जंुपली होती.

बाहेरच्या मजुरांना रोजगार द्यावा : चिराग

एनडीएमध्ये सहभागी असलेल्या लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले, बाहेरच्या राज्यांतून बिहारमध्ये आलेल्या मजूर बांधवांना रोजगार देण्यास एनडीए सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. चिराग पासवान यांच्या निशाण्यांवर मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. तत्पूर्वी चिराग यांनी आपला पक्ष भाजपसोबत असल्याचे म्हटले होते.

महाआघाडीत फूट

‘हम’ नेता जितनराम मांझी यांनी राजदवर ‘एकला चलो रे’चा आरोप केला. भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीच्या विरोधात राजदच्या थाळीनाद आंदोलनावरून महाआघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. महाआघाडीत सहभागी असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे (हम) नेते जितनराम मांझी यांनी शनिवारी म्हटले, राजदचे ‘एकला चलो रे’चे धोरण आहे. यामुळे एनडीएला पराभूत करणे खूप कठीण जाणार असल्याचे सांगितले. मांझी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री एक बैठक झाली. यात राजद सोडून अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...