आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2002 मध्ये 'धडा' शिकवल्याने गुजरातमध्ये शांतता:अमित शहा यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले- भाजपने स्थायी शांतता प्रस्थापित केली

अहमदाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2002 साली असामाजिक तत्वांना धडा शिकवल्यामुळे गुजरातमध्ये शांतता नांदत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. ते म्हणाले - गुजरातमध्ये पूर्वी असामाजिक तत्व हिंसाचारात लिप्त होते. काँग्रेसचे त्यांना पाठबळ होते. पण 2002 मध्ये धडा शिकवल्यानंतर गुन्हेगारांनी आपल्या कारवाया बंद केल्या. भाजपने राज्यात स्थायी शांतता प्रस्थापित केली.

गुजरातमध्ये फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.

काँग्रेसकडून एका वर्गावर अन्याय

गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारार्थ अमित शहांनी शनिवारी खेडा जिल्ह्यातील महुधा येथे सभा घेतली. त्यात त्यांनी 2002 च्या दंगलीचा दाखला देत काँग्रेसवर तिखट टीका केली. ते म्हणाले - "गुजरातमध्ये काँग्रेसच्या राजवटीत (1995 पूर्वी) नेहमीच दंगली होत होत्या. काँग्रेस विविध समुदाय व जातींच्या सदस्यांना एकमेकांविरोधात चिथावणी देत होती. याच माध्यमातून त्यांनी आपली व्होट बँक मजबूत केली. तसेच एका मोठ्या वर्गावर अन्याय केला."

'धडा' शिकवल्याने शांतता प्रस्थापित

शहा म्हणाले -"गुजरातमध्ये 2002 मध्ये दंगल झाली. कारण, गुन्हेगारांना प्रदिर्घ काळापर्यंत काँग्रेसचे समर्थन मिळाल्यामुळे त्यांना हिंसाचाराची सवय झाली होती. पण 2002 मध्ये त्यांना धडा शिकवल्यानंतर अशा तत्वांनी हिंसेचा मार्ग सोडला. ते लोक 2002 पासून 2022 पर्यंत हिंसाचारापासून दूर आहेत." भाजपने जातीय हिंसाचारात सहभागी लोकांवर कठोर कारवाई करून गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींचे कौतुक

यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार म्हणाले. ते म्हणाले - पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करून कौतुकास्पद काम केले. काँग्रेसचा आपल्या मतपेटीच्या राजकारणासाठी याला विरोध केला होता.

बातम्या आणखी आहेत...