आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Minister Amit Shah West Bengal Live Updates ; West Bengal; CM Mamata Banerjee, TMC, Parivartan Yatra In WB, West Bengal Assembly Election 2021, Assembly Election 2021

गृहमंत्र्यांचा बंगाल दौरा:शाह म्हणाले - 'लसीकरण संपताच CAA लागू करणार; जोपर्यंत ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत होत नाहीत, तोपर्यंत येथे येत राहिल'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'नरेंद्र मोदींना संधी द्या, सोनार बांग्ला करू'

गृहमंत्री अमित शाह गुरुवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर पोहोचले. ठाकूरनगर रॅलीला संबोधित करत त्यांनी म्हटले की, आम्ही नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) घेऊन आलो, मात्र मध्येच कोरोना आला. ममता दीदी म्हणू लागल्या की, हे खोटे वचन आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही जे म्हणतो, ते करतो. ज्यावेळी लसीकरण पूर्ण होईल, कोरोनापासून मुक्ती मिळेल, तुम्हा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम भाजप सरकार करेल.

शाह यांनी ममता सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, भाजप पश्चिम बंगालमध्ये हिंसा थांबवून विकासाचे नवीन पर्व सुरू करत आहे. मी दुसऱ्यांदा ठाकुरनगरच्या पवित्र धरतीवर आलो आहे. काही परिस्थितींमुळे माझा पहिला दौरा रद्द झाला होता. तेव्हा ममता दीदी खूप आनंदी झाल्या. अरे ममता दीदी! अजुन खूप वेळ आहे एप्रिल पर्यंत, मी वारंवार येईल. तुम्ही जोपर्यत निवडणूक हारत नाही, तोपर्यंत मी येईल.

अमित शहांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

इथे श्री राम नाही बोलणार तर, मग पाकिस्तानात बोलणार का ?

अमित शहा म्हमाले की, जयश्री राम बोलण्यावर ममता दीदींचा आक्षेप आहे. येथे जयश्री राम नाही बोलणार तर, मग पाकिस्तानात बोलणार का ? सर्वांनी हात वर उचलून माझ्यासोबत म्हणा... जय श्रीराम, जय जय श्रीराम। या घोषणेने ममता दीदींचा अपमान होतो, कारण त्यांना तुष्टीकरणातून एका विशीष्य समाजातील मत हवेत. मला खात्री आहे, निवडणूक जवळ येईपर्यंत ममदा दीदी जय श्रीराम बोलतील.

बंगालमध्ये एक पक्षीदेखील येऊ शकणार नाही

अमित शहा म्हणाले की, तृणमूल वाले म्हणतात, भाजपचे लोक परिवर्तन यात्रा का काढतात ? मी आज त्यांना सांगायला आलोय, ही कोणत्या मुख्यमंत्र्यांला बदलण्यासाठी किंवा आमदाराला पाडण्यासाठी आयोजित केली नाही. ही बंगालची परिस्थिती बदलण्यासाठी आयोजित केलेली परिवर्तन यात्रा आहे. तुम्हाला घुसखोरीचा त्रास होतोय का नाही ? ममता दीदी घुसखोरी थांबवू शकत नाही का ? ही घुसखोरीला थांबवण्याची यात्रा आहे. तुम्ही एकदा भाजपच्या हाती सत्ता द्या. माणुस काय, एक पक्षीदेखील राज्यात येऊ देणार नाही.

नरेंद्र मोदींना संधी द्या, सोनार बांग्ला करू

शहा पुढे म्हणाले की, या वेळेसची परिवर्तन यात्रा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाच्चा अभिषेक बॅनर्जीचे भ्रष्टाचार संपवण्याची यात्रा आहे. ही यात्रा राज्याती बेरोजगारी संपवण्याची यात्रा आहे. ही यात्रा येथील बॉम्ब स्फोटांना बंद करण्याची यात्रा आहे. ही हिंसेच्या जागी विकास करण्याची यात्रा आहे. ही सोनार बांग्ला करण्याची परिवर्तन यात्रा आहे. तुम्ही ममता दीदींना खूप संधी दिल्या. आता नरेंद्र मोदींना संधी देऊन पाहा. राज्याला सोनार बांग्ला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

ममता दीदींना आपले अकाउंट डिटेल दिले नाही, पैसे कुठे पाठवणार ?

ममता दीदींना वाटतं की, त्यांचे गुंडे निवडणूक जिंकून दाखवतील. तुमच्या दंगप्रमुख गुंडांसमोर आमचे बूथ प्रमुख आहेत. बंगालच्या जनतेते यंदा परिवर्तन करण्याचे ठरवले आहे. आता मोदी जी आले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. पण, कोच राजवंशी समाज आणि इतर लोकांच्या समाजातील लोकांनी सांगावे की, तुमच्या अकाउंटमध्ये 6 हजार येतात का नाही ? कसे येणार , ममता दीदींनी त्यांचा अकाउंट नंबर दिला नाही. आम्ही पाठवलेले पैसे तुमच्यापर्यंत येऊच देत नाहीत.

का महत्वाचा आहे ठाकूरनगर ?

राज्‍यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर बंगाल राजकारणात महत्‍वाचा मानला जात आहे. ठाकूरनगर मटुआ समाजाचा गड मानला जातो. हे क्षेत्र बांग्‍लादेश सीमेपासून फक्‍त 15 किलोमीटर अंतरावर आहे.

दलित मटुआ समाजाचा 70 जागांवर प्रभाव

पश्चिम बंगालमध्‍ये दलित मटुआ समाज हा विधानसभा क्षेत्रातील 70 जागांवर पसरलेला आहे. काही जागांवर यांचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रभाव असून, 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत या समाजाने आपले समर्थन भाजपाला दिले होते. बोनगाव मतदारसंघातून भापज उमेदवार शांतनु ठाकूर यांना समाजाने एकमताने निवडून आणत काँग्रेसच्‍या बाळा ठाकूर यांना पराभूत केले होते.

एप्रिल-में मध्‍ये होऊ शकतात निवडणुका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही यावर्षी एप्रिल-मे महिण्‍यात होण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्‍यसभा खासदार आणि मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा हे ऐतिहासिक श्री मदन मोहन मंदिरात जाऊन पुजा करणार आहेत. त्‍यानतंर ते कुच बिहार येथील रास मेला मैदानात परिवर्तन यात्रेतील दुसऱ्या फेरीला हिरवा झेंडा दाखवतील.

5 टप्‍पात भाजप काढणार परिवर्तन यात्रा

भाजप 5 टप्‍प्यात पश्चिम बंगालमधील परिवर्तन यात्रेच आयोजन करत आहे. यातून राज्यातील सर्व मतदारसंघ कव्हर करण्याचा विचार आहे. यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्‍यानतंर गृहमंत्री उत्‍तर 24 परगाना जिल्‍हातील ठाकूरनगर येथील श्री हरिचंद्र ठाकूर मंदिरामध्‍ये पुजा करतील. यानंतर ते सार्वजनिक रॅलीला संबोधित करतील. यानंतर ते, कोलकातामधील सांयस सिटीचा दौरा करतील, जेथे ते सोशल मीडिया व्‍हॉलेंटिअरच्‍या बैठकीला संबोधित करतील.

गृहमंत्र्यांनी मागच्‍या वर्षी डिसेंबरमध्‍ये केला होता दौरा

अमित शहांनी मागच्‍या वर्षी 19-20 डिसेंबरला पश्चिम बंगाल दौरा केला होता. त्यादरम्यान, तृणमूल नेते शुभेंदू अधिकारी यांच्यसह 35 नेत्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. यानतंर शाह जानेवारीमध्‍ये बंगाल दौऱ्यावर जाणार होते. परंतु, दिल्‍लीमध्‍ये इस्राइल दूतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.

बातम्या आणखी आहेत...