आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:ज्या विमानतळावरून साेन्याची तस्करी झाली ते सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात, गृहमंत्री शहा उत्तर देतील का : विजयन

तिरुवनंतपुरमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काहीही केले तरी लाेक भाजपला नाकारतील : पिनराई विजयन

केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलाची परंपरा मोडून पुन्हा सत्तेत येण्याबाबत सत्तारूढ एलडीएफ निर्धास्त आहे. डावी आघाडी सोने तस्करीप्रकरणी विरोधकांच्या निशाण्यावर असलेले मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात मैदानात आहे. काँग्रेस नेतृत्वातील यूडीएफ आणि भाजप या प्रकरणात त्यांच्यावर हल्ले करत आहे. दरम्यान, विजयन त्यांचा मतदारसंघ धर्मादमसह इतर भागांत प्रचाराला लागले आहेत. व्यग्र निवडणूक कार्यक्रमादरम्यान त्यांनी ‘भास्कर’सोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली...

एलडीएफला किती शाश्वती आहे?
आम्ही आमचे आश्वासन पूर्ण केले आहे. एलडीएफचे उमेदवार जाहीर झाले आहेत. सर्वच मतदारसंघांत आमचा पहिल्या टप्प्यातील प्रचारही पूर्ण झाला आहे. आम्हीच जिंकणार.

अमित शहा यांनी सोने घोटाळ्याबाबत तुम्हाला सहा प्रश्न केले होते?
त्यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी मी उत्तर दिले आणि त्यांना काही प्रश्न विचारले. ज्या विमानतळावरून सोने तस्करी झाली ते केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. एनडीए काळात पूर्ण देशात तस्करी वाढली. गृहमंत्री म्हणून त्यांनी उत्तर द्यायला हवे.

तुमचे सचिव सोने घोटाळ्यात आरोपी आहेत, तुम्ही तर उत्तर द्यायला हवे. मी माध्यमांना नियमित भेटतो. जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे दिली.

डीप सी शिपिंग डीलबाबतही वाद झाला, तो अचानक रद्द का केला?
असा कोणताही करार झाला नाही. एक एमओयूवर खासगी फर्म आणि पीएसयू यांच्यात स्वाक्षरी झाली होती. ते कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला माहीत नव्हते. यामुळे तो रद्दच होणार होता.

टू टर्म नॉर्मवरून पक्षातही विरोध आहे?
आम्ही एकत्र आहोत. लोकांना पाच वर्षांतील कामे सांगतोय. विकासावर मते मागतो आहोत. आमचे लक्ष्य नावा केरलम (नवे केरळ) बनवायचे आहे.

राहुल गांधी तुम्हाला भ्रष्ट म्हणताहेत अन् बंगालमध्ये डाव्यांसोबत आहेत...?
केरळमध्ये काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष आहे. इतर राज्यांत काहीही असो, मात्र येथे इतर राज्यांसारखी स्थिती नाही.

भाजपच्या लव्ह जिहाद, सबरीमाला मुद्द्यांचा तुम्हाला फटका बसेल?
भाजपचे केरळमध्ये स्वागत आहे. त्यांनी कितीही आदळआपट केली तरी केरळची जनता त्यांना नेहमीप्रमाणे या वेळीही नाकारेल.

एलडीएफ कोणाच्या नावाने मते मागतोय?
व्यक्तीच्या नावाने आम्ही लढत नाही. आमचे उद्दिष्ट ५ वर्षांत ५० कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करायचे आहे. आम्ही ६३२०० कोटींची काम पूर्ण केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...