आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Home Minister Targets Congress In Lok Sabha 'Tell Us What Those Who Demanded 17 Months Account Have Done In 70 Years?'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलम 370 वर शहा यांचे भाष्य:पिढ्यानपिढ्या राज्य करणारे आम्हाला दिड वर्षांच्या कामाचा हिशोब मागत आहेत, त्यांना याचा अधिकार आहे का?

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योग्य वेळ आल्यावर जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा देऊ

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भाष्य केले. शहा म्हणाले, 'ज्यांना पिढ्यानपिढ्या राज्य करण्याची संधी दिली गेली आहे, त्यांनी त्यांच्या अंतकरणात डोकावून पाहावे की, ते हिशोब मागण्याच्या लायकीचे आहेत की नाही'. शहा म्हणाले की, कलम 370 हटवण्याबाबतच्या खटल्यावर कोर्टात दिर्घ सुनावणी सुरू होती आणि ते 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात वर्ग करण्यात आले.

आता विरोधी पक्ष आम्हाला सांगत आहे की, सर्वोच्च न्यायालयासमोर जा आणि त्यांना लवकरात लवकर सुनावणी करण्यास सांगा. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर आहोत आणि देशात कलम 370 असून नये यासाठी आम्ही समोर आहोत. सर्वोच्च न्यायालयात सध्या व्हर्जुअल सुनावणी सुरू आहे आणि या प्रकरणात व्हर्चुअल सुनावणी होऊ शकत नाही. जेव्हा व्हर्चुअल सुनावणी पुन्हा सुरू होईल तेव्हा या प्रकरणाची सुनावणी केली जाईल.

योग्य वेळ आल्यावर जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा देऊ
शहा म्हणाले, 'जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल. गोवा राज्य नाही का? मिझोरम हे एक राज्य नाही? जर तुम्ही काळजीपूर्वक वाचले तर फजिती होणार नाही. ज्या ठिकाणी जशी भौगोलिक व प्रशासकीय परिस्थिती असते, तेथे त्या हिशोबाने अधिकाऱ्यांना पाठवावे लागते. या गोष्टी तुम्ही हिंदू-मुस्लिममध्ये विभागतात, देशातील अधिकाऱ्यांनाही तुम्ही विभागत आहात. एखादा हिंदू अधिकारी मुस्लिम जनतेची आणि मुस्लिम अधिकारी हिंदू जनतेची सेवा करू शकत नाहीत? यानंतर तुम्ही स्वत: ला धर्मनिरपेक्ष म्हणता, हा कोणता धर्मनिरपेक्ष आहे? '

कोणाच्या दबावाखाली कलम 370 इतका काळ लागू ठेवले?
शाह म्हणाले, 'आता हे लोक म्हणत आहेत की 2G चे 4G आम्ही परदेशीयांच्या दबावाखाली केले. हे मोदींचे सरकार आहे, ज्यात देश निर्णय घेतो. आम्ही या सेवा काही काळासाठी बंद केल्या होत्या, जेणेकरून अफवा पसरू नयेत. तुम्ही तर अटलजींच्या काळात मोबाईल बंद केले होते. सुखात आणि शांततेत जगणे हा नागरिकाचा सर्वात मोठा हक्क आहे. जिथे सुरक्षा नसेल तेथे कोणते हक्क असतील? मला हे विचारायचे आहे की, तुम्ही कोणाच्या दबावाखाली इतके दिवस कलम 370 लागू ठेवले?

कॉंग्रेसने तात्पुरती कलम 370 वर्षे लागू ठेवली
शाह म्हणाले, 'मी हा करार काळजीपूर्वक वाचतो. आधीच्या सरकारने दिलेली आश्वासनेसुद्धा काळजीपूर्वक वाचून अंमलात आणली पाहिजेत. 370 हे तात्पुरता करार होता. 17 महिन्यात तुम्ही आम्हाला हिशोब मागत आहात आणि 70 वर्षे तात्पुरते कलम 370 वर्षे चालले, त्याचे उत्तर कोण देईल? आम्ही येऊ-जाऊ, जिंकू-पराभूत होऊ, पण हे लक्षात घेऊन देशाला तसेच ठेवणार नाही. हा तुमचा विचार आहे. तुम्ही म्हणता की, अधिकाऱ्यांचा काम करण्याचा अधिकार जाईल. काश्मीरमध्ये अधिकारी का काम करु शकणार नाही? काश्मीर देशाचा भाग नाही का? काश्मीरच्या तरुणांना IAS आणि IPS बनण्याचा अधिकार नाही का? काँग्रेसचा काळ आठवा काय होत होते? हजारो लोक मारले जात होते आणि वर्षांनुवर्षे कर्फ्यू राहत होता. काश्मीरमध्ये शांतता खूप मोठी गोष्ट आहे. देव करो तिथे कधीच अशांती असू नये.

बातम्या आणखी आहेत...