आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Ministry Alerts; Do Not Share Vaccination Certificate On Social Media, Data May Be Leaked

गृह मंत्रालयाचे अलर्ट:डेटा लीक होण्याची भीती, व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करू नका

गृह मंत्रालयाचे अलर्ट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्टिफिकेटद्वारे तुमचा खासगी डेटा लीक होण्याची शक्यता

जर तुम्ही लस घेतल्यानंतर सरकारकडून मिळालेले व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर केले असेल, तर सावध व्हा. या सर्टिफिकेटद्वारे तुमचा खासगी डेटा लीक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये नाव, वय, लिंग आणि पुढील डोससंबंधी तारखेसह इतर महत्वाची माहिती असते. ही माहिती गुन्हेगारांसाठी फायद्याची ठरू शकते. गृह मंत्रालयाने यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंट (सायबर दोस्त) वर एक पोस्टरदेखील जारी केले आहे.

जानकार सांगतात की, सर्टिफिकेटवर असलेल्या क्यू-आर कोडला स्कॅन केल्यानंतर इतर माहितीदेखील मिळते. ही माहिती मिळवून आरोपी त्या व्यक्तीला फोन करू शकतात आणि त्यांच्याकडून इतर खासगी माहिती गोळा करू शकतात. या खासगी माहितीमध्ये फोन नंबर, ओटीपी इत्यादी माहिती असू शकते. याद्वारे तुमच्यासोबत सायबर फ्रॉड होऊ शकतो.

याप्रकरणी जालंधरचे सायबर क्राइम एसपी रवी कुमारने सांगितले की, व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये अनेक लोकांनी प्रूफ म्हणून पॅन आणि आधार कार्डसारके डॉक्युमेंट्स दिलेले असतात. यामुळे सायबर गुन्हेगारांकडे आपलाय सगळा डेटा जातो आणि फसवणूक होते.

बातम्या आणखी आहेत...