आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Ministry Report On Kashmir Valley Violence And Foreign Terrorists, Latest News And Update

जम्मू-काश्मिरात 134 सक्रिय अतिरेक्यांपैकी 83 परदेशी:गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा; यंदा आतापर्यंत 167 अतिरेकी ठार

जम्मू/श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मिरातील सक्रिय परदेशी अतिरेक्यांचा आकडा वाढला आहे. गृह मंत्रालयाच्या एका अहवालातून याचा खुलासा झाला आहे. त्यात केंद्रशासित प्रदेशात सद्यस्थितीत वेगवेगळ्या संघटनांचे तब्बल 134 अतिरेकी सक्रिय असून, त्यातील 83 परदेशी व 51 स्थानिक आहेत.

याशिवाय सरकारने दावा केला आहे की, खोऱ्यात चालू वर्षात आतापर्यंत 167 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यात 41 परदेशी व 126 स्थानिक अतिरेक्यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) काश्मीर रेंज विजय कुमार यांनी सांगितले की, यंदा मारलेल्या परदेशी अतिरेक्यांचा (FT)आकडा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. 2021 मद्ये 21 परदेशी अतिरेकी ठार झाले होते. तर यंदा आतापर्यंतच तब्बल 41 एफटी ठार झालेत.

खोऱ्यात हिंसाचार वाढला -भारताची कबुली

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईत झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीत गृह मंत्रालयाने काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंसाचार उफाळल्याचे मान्य केले होते. सरकारी आकडेवारीनुसार, 2018 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 600 अतिरेकी शिबिर होते. 2021 मध्ये ते 150 पर्यंत घसरले. पण सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचा आकडा पुन्हा वाढून 225 वर पोहोचला.

काश्मिरी पंडितांना मारणारा अतिरेकी ठार

जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या अवंतीपोऱ्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यात लश्करचा कमांडर मुख्तार भटचा समावेश होता. तो खोऱ्यातील काश्मिरी पंडित व स्थलांतरितांवर हल्ले करत होता. त्याच्यासोबत पुलवामाचा सकलैन मुश्ताक व पाकिस्तानी अतिरेकी मुश्फिकही ठार झाला आहे. सुरक्षा दलांनी अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे अतिरेकी सुरक्षा दलाच्या तळावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. पण तत्पूर्वीच त्यांना ठार मारण्यात आले.

मुख्तार अहमद भट लश्कर ए तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंट फ्रंटचा कमांडर होता.
मुख्तार अहमद भट लश्कर ए तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंट फ्रंटचा कमांडर होता.

श्रीनगरमध्ये 3 हायब्रिड अतिरेकी जेरबंद

जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी हरनामबदलमध्ये 3 बायब्रिड अतिरेक्यांना अटक केली. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून 10 किलो बकेट IED व 2 ग्रेनेड जप्त केलेत. श्रीनगर पोलिसांनी सांगितले की, बॉम्बनाशक पथकाने रंगरेथ क्षेत्रात हे IED नष्ट केले. तसेच UAPA, लष्करी व स्फोटके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...