आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत कोरोना रुग्णांचे दोन सहाय्यक:आपल्या किचनमधून​​​​​​​ होम क्वारंटाइन रुग्णांचे पोट भरत आहेत मुंबईचे हे दानवीर, रोज 200 लोकांपर्यंत पोहोचवत आहेत जेवण

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेवण बनवण्यासाठी एका किचनची घेतली मदत

महामारीच्या या संकट काळात एकीकडे लोक घरांमध्ये बंद आपला जीव वाचवत आहेत. तर असे लोक असे आहेत जे रस्त्यांवर उपाशी आणि गरजूंना जेवण देत आहेत. मुंबईत राहणाऱ्या अशाच दोन लोकांची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे आपले सर्व काही सोडून गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना सेवा देत आहेत.

मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांमध्ये होम क्वारंटाइन राहणाऱ्या लोकांना कूरिअरच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत जेवण पोहोचवण्याची जबाबदारी राजीव सिंगल यांनी घेतली आहे. पेश्याने बिझनेसमन असलेले राजीव मुंबईच्या दहिसर परिसरात राहतात. लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्यासाठी सिंघल यांनी मलाडच्या आशा किचनची मदत घेतली आहे.

जेवण बनवण्यासाठी एका किचनची घेतली मदत
आशा किचन चालवत असलेल्या संचाकल आशा भरतिया आणि कृष्णा भरतिया यांनी आपल्या 1BHK घराला किचनमध्ये रुपांतरीत करुन लोकांची मदत करणे सुरू केले आहे. दोघंही पति-पत्नी रोज 200 लोकांसाठी दोन वेळचे जेवण बनवून होम क्वारंटाइन राहत असलेल्या लोकांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचत आहेत. अनेक वेळा स्विगी आणि झोमॅटोच्या टीमकडूनही मदत घेतली जात आहे.

स्वतःला मिळत नाहीये योग्य जेवण, यामुळे आता लोकांपर्यंत पोहोचवत आहेत राजीव सिंघल यांनी सांगितले की, 'जेव्हा मी आणि माझे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होते, तेव्हा होम क्वारंटाइनमध्ये राहत असताना मला आणि कुटुंबाला पौष्टिक आहार मिळू शकत नव्हता. कोरोनामुळे बिल्डिंग सील होती. यामुले बाहेरुनही जेवण मागवू शकत नव्हतो. यामुळे त्यांनी ठरवले की, आता होम क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या लोकांची मदत करावी.'

मुंबईचे राजपुरिया देखील 200 लोकांना रोज जेवू घालत आहेत
अशाच प्रकारे मुंबईच्या विलेपार्लेच्या राजपुरिया किचन चालवत असलेले योगेंद्र राजपुरियाही करत आहेत. ते म्हणतात की, त्यांच्या किचनमधून दररोज जवळपास 200 लोकांसाठी जेवण बनवले जात आहे. त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये राहत असलेल्या लोकापर्यंत जेवण पोहोचवण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा सारख्या राज्यांमधून लोकांचे फोन येतात आणि त्यांनी सांगितलेल्या अॅड्रेसवर राजपुरिया आणि त्यांची टीम जेवण पोहोचवते.

बातम्या आणखी आहेत...