आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Homes Of Kashmiri Pandits Should Not Be Rehabilitated Again, Says Sarsanghchalak Mohan Bhagwat\Marathi News

काश्मिरी पंडितांवर सरसंघचालकांचे मत:काश्मिरी पंडितांना विस्थापित करण्याची कुणी हिंमत करणार नाही अशा पद्धतीने त्यांना वसवले पाहिजे - मोहन भागवत

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरी पंडितांनी पुढील वर्षी आपल्या मातृभूमीत पुनर्वसित होण्याचा संकल्प सोडला पाहिजे. त्यांना विस्थापित करण्याची कुणी हिंमत करणार नाही अशा पद्धतीने त्यांना वसवले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भागवत यांनी रविवारी तीनदिवसीय नवरेह उत्सवाच्या समारोपात काश्मिरी हिंदूंना संबोधित केले. ते म्हणाले की, पुढील वर्षी काश्मिरी हिंदूंनी आपल्या घरी काश्मीरमध्ये साजरा करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे. आम्ही आपल्या अटीनुसार परत यावे आणि तेथे राहावे. तुमचे घर पुन्हा उजाडले जाऊ नये अशा पद्धतीने राहायचे आहे. आम्ही मूलतत्त्ववाद्यांमुळे काश्मीर सोडले. मात्र, आता जेव्हा परतू तेव्हा सुरक्षा आणि उपजीविकेच्या आश्वासनासोबत हिंदू व भारत भक्ताच्या रूपात परत जाऊ.

भागवत म्हणाले, मी याआधीही सांगितले होते की, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याचे निराकरण जागरूकतेने होईल आणि कलम ३७० सारख्या अडचणी हटवाव्या लागतील. आमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आता कलम ३७० नाही.

बातम्या आणखी आहेत...