आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे गुड रीड:प्रामाणिकपणा ‘सुपरपॉवर’ आहे, तो टिकवण्याचे धाडस असल्यास तुम्ही सर्वात वेगळे दिसणार - ब्रिटिश सुपरकोच निक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळी नेता होण्याचा अर्थ भीती, अज्ञा आणि नियंत्रण ठेवत काम करून घ्यावे लागत असे. पण माझ्या मते जो आपल्या जवळच्या लोकांतून सर्वोत्कृष्ट व्यक्तीची निवड करतो तेच चांगले नेतृत्व असते. तो त्यांना सर्वोत्कृष्ट कामासाठी प्रेरणा देतो. कारण सर्वांचा उद्देश समान लक्ष्यप्राप्तीसाठी एकाच दिशेने काम करणे असतो. म्हणजे दुसऱ्याला प्रेरणा देणारेच एक चांगले नेतृत्व असते. प्रेरणा हा चांगला व्यवसायही आहे. बरेच लोक या दोघांची सांगड घालू शकत नाहीत.

जगातील सर्वात यशस्वी टीव्ही आणि चित्रपट फ्रँचायझी डाऊनटाऊन एबेच्या कार्यकारी निर्मात्या लिज ट्रूब्रिज सांगतात की, ‘नेतृत्वाचा संबंध सांभाळून घेण्याशी असतो. तुम्ही लोकांना स्वत:वर विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्ने साकार होतील यासाठी प्रोत्साहन देता.’ प्रेरणादायी नेतृत्व तुमच्यातील एक लहान आवाज ऐकून तो जगापर्यंत पोहोचवण्यास सांगतो, हेच नेतृत्व आहे. तुम्ही ज्यांची काळजी घेता त्यांना बदलाची जाणीव करून देत अधिक जोरकसपणे त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. ज्या एका गोष्टीची कमतरता म्हणजे तो प्रामाणिकपणा होय. ज्या व्यक्तीत प्रामाणिकपणाही असेल आणि ज्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीसोबत काम किंवा व्यवसाय करायला लोक वेडे नाहीत. तुमच्यात प्राणमाणिकपणा राखण्याचे साहस आणि कौशल्य असते तेव्हा तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या जागी पोहोचलेले असाल. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. ट्रॅव्हल मीडिया बिझनेसशी निगडित एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सीईओंनी मागील सत्रात आपले अनुभव सांगितले. त्यांनी काही चुका केल्या आणि ग्राहकाला आश्वासनाप्रमाणे पुरवठा करू शकले नाही. ते ग्राहकाकडे गेले आणि त्यांनी क्षमा मागत म्हटले की, मी तुम्हाला निराश केले. त्यांनी बचावात्मक भूमिका घेण्याऐवजी प्रामाणिक राहण्याचा पर्याय निवडला. आता त्यांचा व्यापार दरमहा १० मिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे. त्यांच्या समाधानी ग्राहकांची संख्याही वाढतच आहे. संदेश स्पष्ट आहे, ‘प्रामाणिकपणा नेतृत्वासाठी सुपरपॉवर आहे.’ अनेक जण चुकीच्या मार्गाने नेतृत्व मिळवू पाहतात. ते आपल्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी लीडर बनू पाहतात. हे सिद्ध करण्यासाठी की ते खूप चांगले आहेत, लोकांवर अधिकार गाजवू पाहतात. मग यातून आनंदच मिळेल याची खात्री नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, दुसऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांचे सर्वोत्कृष्ट मिळवून आणि काही मोलाची कामगिरी करणे हेच तुमच्या नेतृत्वाचा आधार असेल तर तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल. तथापि, वास्तवात आनंदी असलेले असे नेते दुर्मीळच आहेत. लीडरशिपससोबतच एक जबाबदारीही असते, ती म्हणजे स्वत:च्या आनंदाचीही काळजी घ्यावी जेणेकरून दुसऱ्यांसमोर आदर्श निर्माण होईल. तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. एका उंचीवर पोहोचण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा मोह सोडू शकतो, हे नेतृत्वाने आधी स्वत:ला विचारावे. सध्या लीडर इतके व्यग्र आहेत की, त्यांना चांगला विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. केवळ व्यापारातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी मी माझ्या क्लाएंट्सना अशाच चांगल्या विचारांसाठी प्रेरित करतो.

महान नेतृत्वही आपल्यातूनच...
‘लीडरशिप शब्द सध्या नकारात्मक अर्थाने परिपूर्ण दिसतो. कारण काही नेतृत्वांसोबतचे लोकांचे अनुभव चांगले नाहीत. परंतु आम्हाला लक्षात ठेवावे लागेल की, आपल्यातूनच महान नेतृत्व निर्माण झाले आहे. महात्मा गांधी एक महान नेते होते. डेसमंड टूटू, मदर तेरेसाही आदर्शच राहिल्या.

बातम्या आणखी आहेत...