आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्कराला लक्ष करण्यासाठी पाकिस्तान हनीट्रॅपचे एक संपूर्ण नेटवर्क चालवत आहे. नुतचेच जोधपुरातील लष्कराच्या एका जवानाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याची घटना उजेडात आली. 'गनर'पदी तैनात प्रदीपची पाकिस्तानी एजंटने रिया बनून फसवणूक केली. या एजंटचे सौंदर्य व लग्नाच्या आमिषाला भुलून प्रदीपने लष्कराची गुपिते उघड केली. सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे.
ही घटना उजेडात आल्यानंतर दिव्य मराठीने या प्रकरणाचा शोध घेतला. त्यात पाकने आर्मी जवानांची फसवणूक करण्यासाठी हनीट्रॅपचे 7 मॉड्यूल तयार केल्याचे व त्यात 25 तरुणी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. यातील काही महाविद्यालयीन तरुणी तर काही सेक्स वर्कर्स आहेत. त्यांना जवानांना जाळ्यात कसे ओढायचे याची रितसर ट्रेनिंग दिली जाते.
इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये वाचा -कसे काम करते पाकिस्तानी हनीट्रॅप मॉड्यूल
सुख-दुःखात साथ देण्याच्या बहाण्याने सुरुवात, न्यूड कॉलिंग शेवटचा वार
सीक्रेट डॉक्यूमेंट्ससाठी पैशांचीही ऑफर दिली जाते
काही प्रकरणांत या हनीट्रॅप गर्ल्स सीक्रेट डॉक्यूमेंट्ससाठी पैशांचीही ऑफर देतात. लष्कराचे सीक्रेट दस्तावेज 'आर्मी ऑर्डर' व 'ओरबेट' च्या मोबदल्यात 10 ते 12 हजार रुपयांची ऑफर देतात. हे पैसे भारतात अस्तित्वात स्लीपर सेलच्या माध्यमातून पोहोचवले जातात. स्लीपर सेलला बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात. त्यानंतर हे पैसे एटीएम कॅश डिपॉझिट मशीन किंवा ऑनलाइन पद्धतीने फौजीच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.
भारतीय क्रमांकाद्वारे व्हॉट्सअॅप आयडी तयार करतात
भारतीय दलांशी संबंधित अधिकारी व जवानांशी संपर्क साधण्यासाठी या मुली प्रथम स्थानिक लोकांशी मैत्री करतात. मोफत सेक्स चॅट आणि न्यूड व्हिडिओ कॉल ऑफर करून, त्यांच्याकडून व्हॉट्सअॅप ओटीपी मिळवतात. त्यानंतर त्याआधारे भारतीय क्रमांकाचे व्हॉट्सअॅप आयडी तयार करतात. व्हॉट्सअॅपवर +92 नंबर पाहिल्यानंतर कुणाला संशय येऊ नये असा हेतू असतो. +91 हा भारतीय कोड आहे. त्यामुळे तो पाहिल्यानंतर समोरची तरुणी भारतीयच आहे असा जवानांचा समज होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.