आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hope Island The First Thing That The Residents Of This Place Do Is Face The Storm

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होप आयलंड:येथील रहिवाशांचा सर्वप्रथम होतो वादळाशी सामना, म्हणतात- वादळांना घाबरत नाही

होप आयलंड4 महिन्यांपूर्वीलेखक: मनोरमा सिंह
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशात समुद्रामध्ये वसलेल्या ४०-५० घरांच्या लोकवस्तीत म्हणजेच होप आयलंडमध्ये बाहेरून क्वचितच लोक येत असतात. हे आयलंड नैसर्गिक ब्रेक वॉटरप्रमाणे काम करते. तसेच बंगालच्या खाडीतून येणाऱ्या चक्रीवादळांपासून काकीनाडा शहराचे रक्षण करते. बंगालच्या खाडीत निर्माण होणारी वादळे या बेटावरच सर्वात आधी धडकत असतात. परिणामी येथून दुसरीकडे स्थलांतर करण्याचा सल्ला मच्छीमारांना दिला जातो. मात्र ते येथेच राहून वादळाचा सामना करतात.

४०-४५ घरांची वस्ती...मात्र कधीही स्थलांतर नाही, म्हणतात- वादळांना घाबरत नाही
चक्रीवादळाची अजिबात भीती वाटत नाही, असे बेटावरील रहिवासी सांगतात. मागील १५ वर्षांपासून होप आयलंडला नियमितपणे जाणारे एचएमटीव्हीचे स्थानिक पत्रकार श्रीधर सांगतात की, येथे आजपर्यंत चक्रीवादळामुळे जीवितहानी न झाल्याने रहिवाशांचा दावा खराही ठरत आहे. घरांचे नुकसान होत असते. मात्र ते तात्पुरते घर बांधतात. घर बांधण्यासाठी जास्त वस्तूंचा वापर करत नाहीत. तसेच होप आयलंडमधील या मच्छीमारांमुळेच सध्या बेट सुरक्षित आहे. काकीनाडा किनाऱ्यावरून नौकेद्वारे १३ किमीचा प्रवास करून या बेटापर्यंत जाता येते. रेशन, कपडे इत्यादी वस्तूंसाठी येथील रहिवासी नौकेने काकीनाडाला येतात. स्थानिक मच्छीमार सती बाबूने सांगितले, येथील मच्छीमार महिन्याला सरासरी १० ते १५ हजारांपर्यंत कमावतात. लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणी आल्यानंतरही हे लोक आनंदी आहेत. ते बेट सोडून जाण्यास आणि दुसरे काम करण्यास अजिबात तयार नाहीत.

येथे आता शाळा, मतदान केंद्रही
- गत काही वर्षांत शाळा उघडली आहे. जेथे १५ ते २० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. गत‌वर्षी मतदान केंद्रही उघडले.
- वर्षांपासून सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा होता. टीव्ही-फ्रिजचा वापर नाही.
- हे बेट बंगालच्या खाडीत ८.०४ चौरस किमीपर्यंत पसरले आहे. हे २०० वर्षांत कोरिंगा नदीच्या वाळूपासून तयार झाले आहे.

येथे आरोग्य केंद्र अन् रेशन दुकानही नाही
बेटावर कुठलेही आरोग्य केंद्र नाही. तसेच आपत्कालीन स्थितीतही उपचाराची व्यवस्था नाही. एकही रेशन दुकान नाही. लहानसहान गरजांसाठीही एक तासाचा प्रवास करून काकीनाडाला जावे लागते.

बातम्या आणखी आहेत...