आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:होशियारपूरमध्ये भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले, UP तील 7 ठार, 15 जखमी, खुरालगढ साहिब येथे दर्शनासाठी जात होते

जालंधर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील होशियारपूर उपविभागातील गडशंकरमध्ये आज पुन्हा एक अपघात झाला आहे. श्रीगुरु रविदासजींचे निवासस्थान असलेल्या खुरालगढ साहिब येथे बैसाखी निमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

गडशंकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल
जखमींना नागरिकांच्या मदतीने गडशंकरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संगत पहाटे पायी खुरलगडला जात होती. दरम्यान, खुरलगडकडे जाणारा ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि भाविकांना चिरडले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

अपघातात बळी पडलेले भाविक उत्तर प्रदेशातील
श्री गुरु रविदासजी तपोभूमीचे मुख्य सेवेदार म्हणाले की, मृत भक्त उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी आहेत. हे सर्वजण पायी जात असताना ट्रकने त्यांना चिरडले. गुरू रविदासजींचे निवासस्थान असलेल्या खुरलगढ साहिब येथे बैसाखीनिमित्त दर्शनासाठी भाविक येत होते.