आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hospital Cleaner Raped An Infected Woman In Bhopal Memorial Hospital;woman Died The Next Day

महामारीत महापाप:रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने कोरोना संक्रमित महिलेवर केला अत्याचार, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू

भोपाळ | अजय वर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेकअपच्या बहाण्याने आरोपीने महिलेच्या प्रायवेट पार्ट्सला हात लावले

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (BMHRC) मध्ये कोरोना संक्रमित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर महिलेची तब्येत अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आता तब्बल एका महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या काजी कॅम्प परिसरात राहणाऱ्या महिलेवर 6 एप्रिलला BMHRC मध्ये अत्याचार झाला. महिलेने घडलेला प्रकार हॉस्पिटलच्या नर्सला सांगितला. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना बोलवले. पोलिसांनी कलम-376 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आणि आरोपीला तुरुंगात पाठवले. धक्कादायक म्हणजे, पोलिस किंवा हॉस्पिटलने एका महिन्यानंतरही कुटुंबियांना अत्याचाराच्या घटनेची माहिती दिली नव्हती.

चेकअपच्या बहाण्याने आरोपीने महिलेच्या प्रायवेट पार्ट्सला हात लावले

3 किंवा 4 एप्रिला भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पीडित महिलेला भरती करण्यात आले होते. 6 एप्रिलला सकाळी चार वाजता आरोपी सफाई कर्मचारी महिलेच्या रुममध्ये आला आणि चेपअप करण्याच्या बहाण्याने महिलेच्या शरीरावर आणि प्रायवेट पार्टवर स्पर्श करू लागला. यावेळी महिलेने विरोध करताच आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर महिलेने हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या कृष्णा बाई यांना सांगितला आणि त्यांनी नर्सिंग स्टाफ सिस्टर जिंसी यांना माहिती दिली. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महिलेची अचानक तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...