आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hospital Staff Took Out Pregnant, Mother In Law Delivered Delivery Amidst Unbearable Pain In Banswada, Rajsthan

रुग्णलयांचा निर्दयीपणा:डॉक्टरांपुढे हात जोडून विनवण्या करत होते प्रसव वेदनेने तडपणाऱ्या महिलेचे नातेवाइक; भरती न केल्याने चक्क रुग्णालयाबाहेर रोडवरच दिला बाळाला जन्म

बांसवाडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेला दोन सरकारी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला, नंतर सासूनेच रस्त्यावर केली डिलीव्हरी

‘‘साहेब माझ्या पत्नीला मुल होणार आहे. तिला खूप त्रास होतोय. रुग्णालयात दाखल करुन घ्या...’’ ही विनंती होती, कांतुचे पती मानसिंहची. पण, या विनंतीनंतरही गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे ह्रदय पाजळले नाही. त्यांनी चेक करण्यापूर्वीच गरोदर महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिला गावातील दुसऱ्या एका सरकारी रुग्णालयानेही दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर दिड तास प्रसव वेदाना सहन करुन महिलेने रुग्णालयासमोरच रस्त्यावर बाळाला जन्म दिला.

अँब्यूलन्सही उपलब्ध करुन दिली नाही

कांतुला सोमवारी रात्री करणघाटी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर केल्यानंतर तिच्यासाठी अँब्यूलन्सही उपलब्ध करुन दिली नाही. अखेर कुटुंबाने तिला खासगी वाहनातून बांसवाडाला आणले. रस्त्यात तिचा त्रास वाढल्यानंतर तिला मोहकमपुरा हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तिथेही डॉक्टरांनी तिला दाखल करुन घेण्यास नकार दिला आणि तात्काळ बांसवाडाला घेऊन जाण्यास सांगितले.

दिड तास रुग्णालयासमोरच प्रसव वेदना सहन केल्या

कांतुचा त्रास इतका वाढला होता की, पुढचा प्रवासही करणे शक्य नव्हते. त्रास जास्त झाल्यास रुग्णालयातील कर्मचारी तिला दाखल करुन घेतील, या आशेवर पती आणि सासूने तिला रुग्णालयासमोरच बसवले. महिला दिड तास प्रसव वेदनेने तडफडत होती, पण डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांना तिच्यावर दया आली नाही.

सलून वाल्याने चादर दिली, त्यात दिला बाळाला जन्म

अनेक विनंत्या करुनही रुग्णालय स्टाफने दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर सासूने प्रसुती करण्याचे ठरवले. जवळील एका सलून वाल्याने चादर दिली, त्या चादरीच्या आड महिलेने बाळाला जन्म दिला. प्रसुती झाल्याच्या अर्ध्या तासानंतर आरोग्य केंद्रातील पुरुष नर्स खानचंदने रस्त्यावरच बाळाची नाळ कापली आणि कुलगडला जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबाने घरी परत जाण्याचे ठरवले, वाटेत त्यांना काही पोलिस कर्मचारी भेटले. त्यांनी महिलेला कुशलगडच्या सरकारी रुग्णालयात भरती केले.

सीएमएचओने कारवाईचे निर्देश दिले

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. एचएल ताबियार यांचे म्हणने आहे की, मोहकमपुरामध्ये एकच नर्सिंग स्टाफ होता, यामुळेच महिलेला कुशलगडला जाण्यास सांगितले. दरम्यान, तिथे डॉक्टर नसल्यामुळे आणि महिलेला दाखल करुन न घेतल्यामुळे कुशलगडच्या ब्लॉक मेडिकल ऑफिसरला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.