आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊमध्ये गुरुवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. चारबाग येथील हॉटेल रंगोलीच्या तळघरातील बेस्ट बिर्याणी रेस्तरॉंमध्ये भीषण आग लागली. या घटनेत एका तरुणाचा आगीत मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जळाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी हॉटेलमध्ये 7 जण थांबले होते. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सर्वजण नाशिकहून आले होते. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. 11 वाजेपर्यंत धुराचे लोट आणि ज्वाळा दूरवर दिसत होत्या.
आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस-अग्निशमन पथक घटनास्थळी तपास करत आहेत.
हॉटेलमध्ये बिर्याणी खायला आलेले लोक भाजले
ADCP सेंट्रल राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, चारबाग येथे कबीर हॉटेल आहे. त्याच्या एका भागात रंगोली हॉटेलही आहे. रंगोलीच्या तळघरात बेस्ट बिर्याणीच्या नावाने रेस्तरॉं आहे. ज्यामध्ये अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घाईघाईत पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. कर्मचार्यांनी कबीर हॉटेलमध्ये बसवलेल्या उपकरणांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सोबतच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
एडीसीपी म्हणाले की, रेस्तरॉंमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आलेले लोक या अपघातात गंभीर भाजले असून त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे नाशिकचे रहिवासी प्रकाश सुधाकर दात्रे (३०) यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा साथीदार अनीस शेख उर्फ बादशाह याच्यासह ३ जण गंभीर भाजले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.
CFO मंगेश कुमार यांनी सांगितले की, रेस्तरॉंच्या वर बांधलेल्या हॉटेलच्या अग्निशमन उपकरणांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.
सर्वजण लग्नासाठी आले होते
एडीसीपीच्या म्हणण्यानुसार, मृतक आपल्या 7 साथीदारांसह प्रतापगड येथे लग्नासाठी आले होते. गुरुवारी लग्न आटोपल्यानंतर सर्वजण चारबाग येथील रंगोली हॉटेलमध्ये थांबले. तिघे हॉटेलच्या रेस्तरॉंमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेले. तर 4 साथीदार हॉटेलमध्ये आराम करत होते. सर्वजण शुक्रवारी ट्रेनने परतणार होते.
शेजारी गॅस गळतीची तक्रार करत होते
अनेक दिवसांपासून गॅस गळतीचा वास येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. अशा स्थितीत शेजारी राहणारे तक्रार करायचे तेव्हा दुकानदार त्यांना गप्प करायचा. अनेकांनी अपघाताचा इशारा दिला होता, पण प्रत्येक वेळी काही होणार नाही असे सांगितले गेले. सर्वांचे जबाब नोंदवून कारवाई केली जाईल, असे एडीसीपींनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.