आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरापासून सुरू आंदोलनानंतर आता सर्व काश्मिरी पंडीत कर्मचारी कामावर परतले आहेत. आता काश्मीर खोऱ्यात विविध कार्यालयात पुन्हा सामान्य स्थिती निर्माण झाली आहे. हे कर्मचारी पंतप्रधान पॅकेजअंतर्गत विविध विभागांत कार्यरत आहेत. कामावर परतल्यावर काही दिवसांच्या आत त्यांचे प्रलंबित वेतनही अदा करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये घर नसलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना सुरक्षित हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहे. सरकारने ही निवास व्यवस्था अनुदानात उपलब्ध केली . भाड्यातील एक हिस्सा कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो.
बारामुल्लाचा रहिवासी,सरकारी कर्मचारी अवतार कृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन आता जास्त सहकार्यासोबत सुरक्षेच्या स्थिती चांगली करत आहे. बहुतांश मुद्दयांवर समाधान झाले असून उर्वरित विचाराधीन आहेत. अवतार म्हणाले, अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान बांधले जात आहे. बारामुल्लात १८० सदनिका बांधल्या असून त्यांचे लवकरच वाटप होईल. अधिकृत निवासस्थान नसलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अवतार एक आहेत. ते भाड्याच्या घरात राहतात. येथे मुस्लिम लोकसंख्येसोबत राहण्यात कोणतीही अडचण नाही. आपण स्वत: मुस्लिम कुटुंबाच्या घरी भाड्याने राहत असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, टार्गेट किलिंगमुळे मुस्लिम येथील मुस्लिम लोकसंख्येच्या मनात भीती निर्माण झाली होती. सध्या स्थिती ठीक आहे. मात्र, तरीही अनेक मुस्लिम घरमालकांना भीती वाटते की, त्यांच्या घरी धोका निर्माण होऊ नये.गेल्या वर्षी मे महिन्यात बडगामच्या चदरा तहसिल कार्यालयात घुसून लिपिक राहुल भटची गोळी झाडून हत्या केली होती. यानंतर शिक्षिका रनजी बाला यांचीही हत्या केली होती. या घटनेनंतर ४००० हून जास्त काश्मिरी पंडितांनी असुरक्षित वातावरणाच्या कारणावरून काश्मीरबाहेर बदलीसह अन्य मागण्यांसाठी संप पुकारला हाेता. आता तो मागे घेतला आहे.
७ ठिकाणी सरकारी निवासस्थाने, प्रत्येक कर्मचाऱ्यास घर
काश्मीरमध्ये ७ ठिकाणी काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांसाठी सदनिका तयार होत आहेत. सरकारानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला घर मिळेल आणि सुरक्षा पुरवली जाईल. सरकारने या वर्षअखेरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांसाठी फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत ६००० स्थलांतरिक कर्मचाऱ्यांची निवड केली होती, त्यापैकी ४५०० काश्मिरी पंडीत आहेत. यामध्ये शीख, मुस्लिमही असून त्यांची संख्या १५०० च्या आसपास आहे. त्यांनी ९० च्या दशकातील हिंसाचारात काश्मीर सोडले होते.
जोडीदारासोबत काम करण्याची सवलत
नियुक्तीनंतर सर्वात मोठी अडचण अशी जोडपी होती, ज्यांची नोकरी वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे. आता विवाहित जोडप्यांना एकाच जिल्ह्यात नियुक्ती देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.