आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात तारांगण...:काश्मिरात  हाऊसबोट उत्सवाला सुरुवात

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी दोनदिवसीय हाऊसबोट उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते झगमगणारे शिकारा. त्यालाच हाऊसबोट म्हटले जाते. त्याशिवाय येथील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट, लेझर शो, आर्ट एक्झिबिशन व भोजनाचा आस्वादही घेता येतो. दाल व नगीन तलावात सध्या ९५० हाऊसबोटी आहेत. त्यावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पर्यटन संचालक फजलूल हसीब म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून काश्मीर थंडीतही उत्साही असते असा संदेश देऊ इच्छितो. छायाचित्र : आबिद बट

बातम्या आणखी आहेत...