आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विप्रो', 'बायजूस'च्या मालकांची घरे पाण्याखाली:​​​​​​​बंगळुरुची सर्वात महागडी सोसायटी बुडाली; एका व्हिलाची किंमत 10 कोटी

बंगळुरु17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरुत जवळपास 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. बंगळुरुतील अनेक भाग गत काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांवर आभाळ तर कोसळलेच आहे. पण श्रीमंतांनाही या स्थितीचा गंभीर फटका बसला आहे.

बंगळुरुच्या एप्सिलॉन भागात अनेक कंपन्यांचे संस्थापक व सीईओ राहतात. हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. या कम्युनिटीत निवडक 150 जण राहतात. त्यात विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी, ब्रिटानियाचे सीईओ वरुण बेरी, बिग बास्केटचे सह-संस्थापक अभियन चौधरी व बायजूसचे सह-संस्थापक बायजू रविचंद्रन यांचा समावेश आहे.

एप्सिलॉनमधील आलिशान बंगल्यांपुढे उभ्या जर्मन व इटालियन लग्झरी कार्सही पाण्याखाली गेल्या आहेत.
एप्सिलॉनमधील आलिशान बंगल्यांपुढे उभ्या जर्मन व इटालियन लग्झरी कार्सही पाण्याखाली गेल्या आहेत.

एक एकरचा प्लॉट 80 कोटींना

एप्सिलॉनमधील एका सामान्य व्हिलाची किंमत 10 कोटी आहे. येथील प्लॉटच्या साइजच्या हिशेबाने किंमती वाढतात. एक एकरच्या प्लॉटची किंमत जवळपास 80 कोटींच्या घरात असते.

एवढी महागडी सोसायटी असूनही ती पुराच्या तडाख्यापासून वाचली नाही. येथील आलिशान व्हिलापुढे उभ्या असणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या लग्झरी कार्सही पाण्यात बुडालेल्या दिसून येत आहेत. येथे राहणाऱ्या श्रीमंतांना नावेच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

अनअ‍ॅकेडमीच्या सीईओंना ट्रॅक्टरने बाहेर काढले

अ‍ॅड-टेक प्लॅटफॉर्म अनअ‍ॅकेडमीचे सीईओ गौरव मुजांल यांचे कुटुंब व श्वानाला ट्रॅक्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. गौरव यांनी मंगळवारी याचा एक व्हिडिओ शेअर केला. ते म्हणाले -‘माझे कुटुंब व श्वान एल्बसला आमच्या सोसायटीतून ट्रॅक्टरने बाहेर काढण्यात आले. आमची सोसायटी पूर्णतः पाण्याखाली गेली. स्थिती वाईट आहे. कृपया आपली काळजी घ्या.’

अनअ‍ॅकेडमीचे सीईओ गौरव मुंजाल यांचे ट्विट. त्यांनी मदत हवी असणाऱ्या नागरिकांना आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
अनअ‍ॅकेडमीचे सीईओ गौरव मुंजाल यांचे ट्विट. त्यांनी मदत हवी असणाऱ्या नागरिकांना आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

बंगळुरुतील पुराची नवी छायाचित्रे पाहा...

बंगळुरुच्या सरजापूरमधील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी बांबूच्या जहाजाची मदत घेत आहेत.
बंगळुरुच्या सरजापूरमधील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी बांबूच्या जहाजाची मदत घेत आहेत.
जलमय झालेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करणारी महिला व एक मुलगा.
जलमय झालेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करणारी महिला व एक मुलगा.
बेलांदूर सरोवर स्वच्छ करताना पालिकेचे कर्मचारी. या सरोवरात कचरा जमल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे.
बेलांदूर सरोवर स्वच्छ करताना पालिकेचे कर्मचारी. या सरोवरात कचरा जमल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे.
बंगळुरुच्या आउटर रिंग रोडवरुन ब्लॉकेज काढताना नगर पालिकेचे कर्मचारी.
बंगळुरुच्या आउटर रिंग रोडवरुन ब्लॉकेज काढताना नगर पालिकेचे कर्मचारी.
बेलांदूरमधील एक प्रवाशी व्यक्ती 2 मुले व सामानासह पाण्याने भरलेला रस्ता ओलांडताना.
बेलांदूरमधील एक प्रवाशी व्यक्ती 2 मुले व सामानासह पाण्याने भरलेला रस्ता ओलांडताना.

JCB वर बसून मुलांनी पूल ओलांडला

बुधवारी बंगळुरुच्या बागलकोट कालव्यावर बनलेला एक पूल ओलांडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. त्यावर शालेय विद्यार्थी बसले होते. त्यांना रस्त्याच्या पलिकडे सोडण्यात आले. दुसरीकडे, अॅमेझॉन, स्विगी सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनीही पाऊस व पूरस्थितीमुळे काही काळासाठी आपल्या सेवा स्थगित केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...