आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार:लाेजपाने कसा बिघडवला खेळ? पराभूत मंत्री-आमदारांची नितीश यांच्याकडे गाऱ्हाणी

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजद म्हणजेच ‘राष्ट्रीय जंगल दल’ : जदयू

विधानसभेत पराभूत झालेल्या जदयूचे मंत्री व आमदारांनी त्यामागील कारणांबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी चर्चा केली. अलीकडेच जदयू कार्यालयात झालेल्या बैठकीला नितीश यांची उपस्थिती हाेती. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील कामगिरीबद्दल शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याचबराेबर सहकाऱ्यांच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जदयूच्या अनेक नेत्यांनी काही भागातील पराभवामागे लाेजपा कशी कारणीभूत ठरली हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला.

लाेजपाला त्यांच्या कृत्याची शिक्षा जरूर मिळायला हवी, असा आग्रह अनेक जदयू नेत्यांनी केला. कृष्णनंदन वर्मा, रमेश ऋषिदेव, संताेष निराला या तिन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चर्चेतील मुद्दे पराभवाच्या कारणाशी केंद्रित हाेते. लाेजपाने सामान्य नागरिकांमध्ये कशा प्रकारे गैरसमज निर्माण करण्याचे काम केले हे त्यांनी सांगितले. त्याचबराेबर लाेजपाच्या या रणनीतीला राेखण्याची उपाययाेजना प्रत्यक्षात तितकीशी प्रभाव दाखवू शकलेली नाही. संभ्रम निर्माण करून जदयूचे हक्काचे मत इतरत्र वळते झाले, असे काही नेत्यांनी स्पष्ट केले.

यादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) आर.पी. सिंह, पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डाॅ. अशाेक चाैधरी, विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चाैधरी आदींची उपस्थिती हाेती. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते राणा रणधीर, विनाेद नारायण झा, प्रमाेदकुमार यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

मतदारांनी धनशक्तीला दिले उत्तर :
पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले नीरजकुमार म्हणाले, येथील मतदारांनी धनशक्ती, वंशवाद व लंपट राजकारणाला चाेख उत्तर दिले आहे. हा बाैद्धिक जनादेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.

राजद म्हणजेच ‘राष्ट्रीय जंगल दल’ : जदयू
राजद म्हणजे राष्ट्रीय जंगल दल हाेय. त्यांचा चेहरा, चरित्र कधीही बदलू शकत नाही, अशा शब्दांत जदयूचे वरिष्ठ नेते नीरजकुमार व प्रवक्ते डाॅ. अजय आलाेक यांनी टीका केली. राजा किंवा युवराज बदलू शकतात, परंतु तेही एकाच कुटुंबातील असतील तरच. ते पत्रकारांशी बाेलत हाेते. बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य आहे, ही गाेष्ट राजदने लक्षात घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...